farm labor return to home from telangana due to chances of lockdown 
विदर्भ

लॉकाडाउनचा धसका! मिरचीतोड मजुरांनी धरला गावचा रस्ता, तेलंगणामध्ये गेले होते कामाला

सकाळ वृत्तसेवा

पोंभुर्णा (जि. अमरावती) : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन केले जाईल, अशीच चर्चा सर्वत्र आहे. त्यामुळे तेलंगणा राज्यात मिरची तोडणीसाठी गेलेल्या मजुरांना लॉकडाउनची भीती सतावत आहे. त्यामुळे अनेक मजुरांनी लॉकडाउनच्या भीतीने गावचा रस्ता धरला आहे.

तेलंगणा राज्यातील अनेक जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. पोंभुर्णा तालुक्‍यासह विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील मजूर शेतीची कामे संपल्यावर तेलंगणात मिरची तोडणीच्या कामासाठी जात असतात. यावर्षीसुद्धा हजारो मजूर तेलंगणा येथे मिरची तोडणीच्या कामासाठी गेले आहेत. मात्र, राज्यात पुन्हा लॉकडाउन लागल्यास मोठा त्रास सहन करावा लागेल, या भीतीने अनेक मजुरांनी गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला आहे.

मिरची तोडणीचा हंगाम सुमारे तीन महिन्यांचा असतो. या कालावधीत मजूर काम करून वर्षभराचे नियोजन करीत असतात. त्यासाठी जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यांतील मजूर या कामासाठी तेलंगणा राज्यात जात असतात. मात्र, मागील वर्षीप्रमाणेच यावर्षीसुद्धा कोरोनाचे संकट आहे. त्यातही महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याने लॉकडाउन होईल, अशी भीती अनेकांत व्यक्त होत आहे. त्यामुळे पोंभुर्णा तालुक्‍यातील अनेक मजुरांनी आपलाच गाव बरा म्हणत वाट धरली आहे.

मागीलवर्षीचा धसका -
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी मागीलवर्षी मार्च महिन्यात देशात लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे अनेक मजूर तेलंगणा राज्यात अडकून पडले होते. लहान मुलांना घेऊन शेतात, झाडाखाली, बसस्थानकात आश्रय घेत दिवस काढावे लागले होते. मजुरांना या काळात मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. अनेकांनी शेकडो किलोमीटर पायदळ गाव गाठले. तर, काही मजुरांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने गावागावांत पोहोचविण्यात आले. यावर्षीसुद्धा लॉकडाउन झाल्यास मोठा त्रास सहन करावा लागेल, अशी भीती मजुरांत आहे. मागीलवर्षीचा धसका घेऊन मजुरांनी गावाचा रस्ता धरला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Relations : तब्बल ३ वर्षांनी पाकिस्तानी मंत्री भारतात येणार! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदाच मोठी घडामोड; दिल्लीत नेमकं काय घडतंय?

Zapatlela Untold Story : 'तात्या विंचू' लंडनला कसा पोहोचला? सुपरहिट मराठी सिनेमाचं आणि शरद पवारांचं 'ते' खास कनेक्शन आलं समोर!

Latest Marathi News Live Update: जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Election Commission: उत्तर प्रदेश, पंजाबसह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार? काय आहे अपडेट?

Kartiki Ekadashi 2026 : विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी! पंढरपूरच्या विठुरायाचे २४ तास दर्शन सुरू; 'या' वेळेस फक्त काही मिनिटेच मिळणार दर्शन!

SCROLL FOR NEXT