A farm worker commits suicide by jumping into the well with two girls
A farm worker commits suicide by jumping into the well with two girls 
विदर्भ

दोन मुलींसह विहिरीत उडी मारून शेतमजुराची आत्महत्या

सकाळवृत्तसेवा

भंडारा : पवनी तालुक्‍यातील केसलवाडा येथील शेतमजुराने शुक्रवारी सायंकाळी दोन मुलींसह विहिरीत उडी घेतली. यातील एका मुलीला वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले. परंतु, बापलेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. प्रमोद रामचंद्र बारसागडे (वय 40), सानवी प्रमोद बारसागडे (वय दीड वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.

अड्याळजवळील केसलवाडा येथील प्रमोद बारसागडे याच्याकडे अर्धा एकर शेती आहे. तो मोलमजुरी करून कुटुंबाची उपजीविका चालवीत होता. त्याच्या कुटुंबात पत्नी व दोन मुली होत्या. प्रमोदला काही वर्षांपासून मानसिक आजार जडला होता, असे कुटुंबीयांनी सांगितले.

शुक्रवारी सायंकाळी त्याने दोन्ही मुलींसह घरी जेवण केले. त्यानंतर दोन्ही मुलींना कडेवर घेऊन त्याने घराजवळ असलेल्या विहिरीत उडी घेतली. दोन लहान मुलींसह शेतमजुराने विहिरीत उडी घेतल्यामुळे गावकरी गोळा झाले.

कुणाल देवानंद रामटेके व गावकऱ्यांनी मिळून त्यांना बाहेर काढले. त्यानंतर अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, शर्वरी बारसागडे (वय चार वर्षे) ही बचावली. प्रमोद बारसागडे व सानवी बारसागडे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अड्याळ पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यावर पित्यासह मुलीचा मृतदेह नातेवाइकांना सोपविण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT