farmer commit to suicide in selu of wardha 
विदर्भ

'कर्जामुळे मी आता जगू शकत नाही, पण माझ्या मुलीचे लग्न करा'

रूपेश खैरी

सेलू (जि.वर्धा): तालुक्‍यातील केळझर येथील शेतकऱ्याने कर्जाबाजारीपणामुळे राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. २६)उघडकीस आली असून त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्यामध्ये कर्जामुळे आत्महत्या करत असून माझ्या मुलीचे लग्न करा, अशी विनंती केली आहे. त्यामुळे सर्व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

योगराज गजानन ईरुटकर (वय ६५)असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे साडेचार एकर शेतजमीन असून त्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व भूविकास बँकेचे कर्ज आहे. जुने कर्ज असल्याने शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नाही. जुन्या थकबाकीदार शेतकऱ्यांना यातून दूर सारल्याने कर्जाचे ओझे डोक्‍यावर घेऊन ते शेती करीत होते. पण यावर्षी सोयाबीनने दगा दिला. नापिकीमुळे सोयाबीनचा खर्चही निघाला नाही. वरून थकबाकीचे वसुलीसाठी बँकांचा तगादा सुरू झाला. यामुळे नैराश्‍यात आलेल्या या शेतकऱ्याने शेवटी मरण पत्करले. दसऱ्याच्या दिवशी रात्रीला सगळे झोपी गेले असताना गळफास घेऊन आत्महत्या केली. 

सोमवारी सकाळी शेजारी राहणाऱ्या मुलाने आवाज दिला असता हा प्रकार उघडकीस आला. मृत्यूपूर्वी या शेतकऱ्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत बँकेच्या कर्जामुळे मी आत्महत्या करीत असून घरच्यांना सहकार्य करून मुलीचे लग्न करा, अशी विनंती  गावातील आपल्या मेहुण्याला केली आहे. तसेच यात घरच्यांचा काही दोष नाही, असेही त्यात लिहिले आहे. या घटनेची माहिती मिळताच सेलू ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजय कापसे, नारायण वरठी, बाळू डवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO News: नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी EPFO चा महत्त्वपूर्ण निर्णय; कुटुंबियांनाही फायदा होणार, नवीन नियम काय?

PM Modi: ओमानमध्ये मोदींचं स्वागत बघून मुस्लिम जग हादरलं! पाकिस्तानी एक्सपर्टचा संताप, ''भारताकडे एवढं लक्ष...''

Mumbai News: मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास होणार, ५१ टक्के भाडेकरूंची संमती पुरेशी; उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

Kolhapur Election : वीस प्रभागांतून तब्बल ३२९ इच्छुक; काँग्रेससमोर उमेदवार निवडीचे मोठे आव्हान

Viral Video : 'हा' व्हिडिओ पाहून चीड येईल! भररस्त्यात जावयाचे सासूसमोर लोटांगण, तरीही पत्नी मिळालीच नाही, नेमका काय प्रकार?

SCROLL FOR NEXT