Farmer commits suicide in Yavatmal district 
विदर्भ

शेतकऱ्यांना खरंच कोणी वाली नाही; पायाला जिवंत वीज तार गुंडाळून बळीराजाने घेतला टोकाचा निर्णय

विनोद कोपरकर

महागाव (जि. यवतमाळ) : गेल्या तीन वर्षांपासून पत्नीला झालेला पक्षघाताचा आजार व यंदा परतीच्या पावसाने कपाशीचे नुकसान झाले. त्यामुळे विवंचनेत असलेल्या शेतकऱ्याने पायाला जिवंत वीज तार गुंडाळून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. १८) सकाळी तालुक्‍यातील उटी येथे घडली.

प्राप्त माहितीनुसार, पंजाबराव माधवराव गावंडे (वय ६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. गावंडे या अल्पभूधारक शेतकऱ्याकडे केवळ एक हेक्‍टर शेती आहे. शेतातील तोकड्या उत्पन्नामुळे ते सातत्याने गरिबीशी दोन हात करीत होते. त्यात मागील तीन वर्षांपासून त्यांच्या पत्नीला पॅरालिसिसचा आजार झाल्याने ते प्रचंड विवंचनेत होते.

यंदा परतीच्या पावसाने शेतातील कपाशी नेस्तनाबूत केली. या संकटाच्या मालिकेमुळे वैफल्यग्रस्त शेतकऱ्याने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. सकाळी शेतात जाऊन त्यांनी वीजतार पायाला गुंडाळला व वीज पंपाच्या फ्यूजमध्ये टाकून स्वतःला करंट लावून आत्महत्या केली.

थोड्यावेळाने ही घटना उघडकीस आली. शेतकऱ्याकडे सोसायटीचे व खासगी सावकाराचे कर्ज थकीत आहे. घटनास्थळी एकच गर्दी झाली होती. मृत शेतकऱ्याच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

युवा शेतकऱ्याची आत्महत्या

अमरावती जिल्ह्यातील असदपूर शहापूर ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या रायपूर येथील अल्पभूधारक युवा शेतकरी नरेंद्र प्रल्हाद खोडके (वय २८) याने शनिवारी (ता. १७) दुपारी घरात गळफास लावून आत्महत्या केली. नरेंद्रकडे एक एकर शेती आहे. यंदा त्याने सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र, सततच्या पावसामुळे सोयाबीनची नासाडी झाली. तसेच तीन-चार महिन्यांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. शिवाय त्याच्यावर हजारो रुपयांचे खासगी सावकारांचे कर्ज होते. कोरोनामुळे सहा महिन्यांपासून हाताला काम नसल्याने सावकारांची देणी कशी चुकती करावी व घरखर्च कसा चालवावा, अशा विवंचनेत नरेंद्र होता.

सहावीच्या विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या

यवतमाळ जिल्ह्यातील सवना येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सहावीत शिकत असलेल्या १२ वर्षीय मुलाने झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. १८) दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आल्याने गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अत्रिनंदन ज्ञानेश्वर गावंडे (वय १२) असे मृत बालकाचे नाव आहे. अत्रिनंदन हा गावातील गोठ्यात असलेल्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत शेजारच्या महिलेला दिसला. याबाबतची माहिती गावात पसरताच घटनास्थळी एकच गर्दी झाली. दरम्यान, अत्रिनंदन याने खरोखरच आत्महत्या केली आहे का की त्याचा घातपात झाला असावा, याबाबतचा तपास महागावचे पोलिस करीत आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT