file photo 
विदर्भ

सावधान! केबीसी लॉटरीच्या नावावर शेतकरी दाम्पत्याला गंडविले

सकाळ वृत्तसेवा

गिरड (जि. वर्धा) : योगेश आनंदराव ठवरी आणि त्यांच्या पत्नी कृतिका योगेश ठवरी, रा. गणेशपूर, ता. समुद्रपूर असे फसवणूक झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. या दाम्पत्याला 26 डिसेंबरला अनोळखी व्यक्तीचा फोन आला. केबीसी ऑफिसमधून बोलतोय, आपण केबीसी व्हॉट्‌सऍप विजेते झाले आहात.

आपल्याला 25 लाखांची लॉटरी लागली आहे. आपल्याला ऑनलाइन टॅक्‍स भरावा लागेल, अशी त्याने बतावणी केली. 25 लाखांच्या आमिषाला पती-पत्नी बळी पडले.

दाम्पत्याने भरली रक्कम

या दाम्पत्याने क्रमाक्रमाने कर भरणा सुरू केला. ऑनलाइन टॅक्‍सच्या नावावर पिनकोड टॅक्‍स 27 हजार 200 रुपये, इन्कम टॅक्‍स 23 हजार, जीएसटी टॅक्‍स 47 हजार 150, कॉम्प्युटर चार्ज 75 हजार, मनी ट्रान्स्फर चार्ज 75 हजार, सीबीआय टॅक्‍स 90 हजार, यानंतर कार रजिस्ट्रेशन फीज 1 लाख 80 हजार अशाप्रकारे टोळक्‍याने दाम्पत्याला रक्कम भरायला लावली.

दाम्पत्याशी व्हिडिओ कॉलने संवाद

काही दिवसांनी एका व्यक्तीने या दाम्पत्याशी व्हिडिओ कॉलने संवाद साधत आम्ही ज्या बॅंक खात्यात पैसे टाकले तो बघून तपासा, असे सांगितले. मात्र या दाम्पत्याने बॅंकेत खात्री केली असता खात्यात पैसे गोळा झालेच नव्हते. या दाम्पत्याला गंडविणाऱ्याने आम्ही ज्या खात्यावर पैसे पाठविले आहे, असे दर्शविण्यासाठी चुकीचे बॅंक खाते क्रमांक पाठविले. दरम्यान, आपल्याला थाप देऊन गंडविण्यात आल्याचे या दाम्पत्याच्या लक्षात आले.

प्रलोभनाला पडले बळी

या दाम्पत्याने 25 लाखांच्या प्रलोभनात टॅक्‍स स्वरूपात अनोळखी व्यक्तीच्या खात्यात तब्बल पाच लाख 29 हजारांची रक्कम भरली. एवढे झाल्यावरदेखील त्या अनोळखी व्यक्तीने व्हिडिओ कॉल करून तीन लाख 50 हजर रुपये पुन्हा आमच्या खात्यात टाका, तुमची रक्कम तुमच्याच खात्यात वळती केली जाईल, असे सांगितले. या प्रकाराने दाम्पत्याला आपली फसगत झाल्याचे लक्षात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुपया सार्वकालिक नीचांकी, डॉलरच्या तुलनेत ६४ पैशांनी कोसळून ९३.५३ वर

Chhatrapati Sambhajinagar News: भोकरदनमध्ये दुर्दैवी घटना; खदानीत बुडून माय-लेकीचा मृत्यू, परिसरात शोककळा

Income Tax: १९६१ चा प्राप्तिकर कायदा इतिहासजमा; नव्या करप्रणालीचा ‘प्रारंभ’ देशभर सुरू

Latest Marathi News Live Update : स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणी दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची SIT चौकशी

Premium Petrol: युद्धाच्या छायेत इंधनदर भडकले; प्रीमियम पेट्रोल आणि डिझेल महाग, ‘एलपीजी’बाबत चिंता वाढली

SCROLL FOR NEXT