Farmer_Suicide.jpg
Farmer_Suicide.jpg 
विदर्भ

सारोळा पीर येथील शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा

सकाळ वृत्तसेवा

मोताळा (जि.बुलडाणा) : तालुक्यातील सारोळा पीर येथील 54 वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता.24) सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास ढोणखेड शिवारात उघडकीस आली. कडूबा ज्ञानदेव चव्हाण असे त्यांचे नाव आहे.

सविस्तर असे की, तालुक्यातील सारोळा पीर येथील शेतकरी कडूबा ज्ञानदेव चव्हाण (वय 54) यांनी ढोणखेड शिवारात गट नंबर 18 मधील शेतात विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविली. सदर घटना शुक्रवारी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. माहिती मिळताच धामणगाव बढे पोलिस ठाण्याचे पीएसआय योगेश जाधव यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.

चिठ्ठी पोलिसांच्या ताब्यात
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बुलडाणा रवाना केला. मृतक शेतकऱ्यांजवळ एक चिठ्ठी मिळून आली असून, पोलिसांनी मृतकाच्या नातेवाइकांच्या उपस्थितीत सदर चिठ्ठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या प्रकरणी गोपाल देविदास चव्हाण (रा. सारोळा पीर) यांच्या फिर्यादीवरून धामणगाव बढे पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनात एएसआय ब्रिजलाल मापारी करीत आहेत.

काय आहे चिठ्ठीतील मजकूर?
वारंवार अर्ज करूनही माझी शेतजमीन माझ्या नावावर नोंद करण्यात आली नाही, असे नमूद असून महसूल विभागाच्या काही कर्मचाऱ्यांचा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, पोलिसांनी मोताळा तहसीलदारांना या प्रकरणी चौकशी करून अहवाल मागितल्याचे समजते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT