washim farmer.jpeg 
विदर्भ

साहेब! फुलांची झाडे जिवापाड जपली होती हो; शेतकऱ्यावर आली ही वेळ

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर (जि.वाशीम) : येथील फूल उत्पादक शेतकरी भगवान घिरके यांनी आपल्या शेतातील फुलांची झाडे उपटून टाकली. कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे, लॉकडाउन दरम्यान फुले विक्री बंद झाली. झाडावरच ही फुले सडू लागले, त्यामुळे जिवापाड जपलेली एक एकरातील फुलांची झाडे उपटून टाकण्याची वेळ घिरके यांच्यावर आली.

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार थांबविण्यासाठी व नागरिकांच्या रक्षणासाठी शासनाद्वारे लॉकडाउन लावण्यात आले. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले. सर्व बाजारपेठा सामसून दिसू लागल्यात. घिरके यांचे दैनंदिन विकल्या जाणारी फुले आता विकणे बंद झालेत. त्यांचा फुले विक्रीचा व्यवसाय पूर्णतः बंद पडला. तेव्हा झाडावरची उमललेली फुले झाडावरच कोमेजून जात होती. येथील शेतकरी भगवान घिरके यांनी आपल्या चार एकर शेतापैकी दोन एकरात सोयाबीन, हळद, गहू अशी पिके घेतली तर दोन एकरात फूल शेती केली होती. 

त्यात दैनंदिन वापरण्यात येणारे शेवंती, गिलाटी, लिली, मोगरा, गुलाब, बिजली, निशिगंधा यासह पासली हे शोचे झाडे देखील लावली होती. त्यांनी काही झाडांच्या रोपांची लागवड जून तर काहींची नोव्हेंबर महिन्यात केली होती. लागवडीपासून जवळपास रोपे विकत घेण्यासाठी 8 हजार रुपये खर्च, त्यासाठी 4 ते 5 हजार रुपयाचे खत, विविध रासायनिक औषधे फवारणी यावर 5 ते 6 हजार रुपये खर्च केला. तर मजूर वगैरे इतर खर्च 5 ते 6 हजार रुपये आत्तापर्यंत त्यांनी खर्च केला. रोपांच्या लागवडी पासून जवळपास 25 ते 30 हजार रुपये त्यांचा खर्च झाला. यातून आतापर्यंत आलेल्या फुलांच्या माध्यमातून साधारणतः 3 ते 4 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असून अजून मे महिन्यापर्यंत यातून उत्पन्न मिळणार होते. 

या माध्यमातून त्यांना जवळपास 1 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, अचानक आलेल्या कोरोनाने घात केला. लॉकडाउनमुळे फुले काढणे व विकणे बंद झाले. स्वतःचा फुलहार विक्रीचा व्यवसाय बंद झाला. फुलांची मागणी पूर्ण बंद झाली. तेव्हा झाडांना लदबदून येणारी फुले झाडावरच कोमेजून जात होती. त्यांनी एका एकरातील फुले तोडून शेताबाहेर फेकून दिले. तर एका एकरातील फुलांची झाडे उपटून टाकलीत. भविष्यात मिळणाऱ्या उत्पन्नाला ब्रेक लागला लॉकडाउन 14 तारखेच्या पुढे ढकलल्या गेले तर, दैनंदिन येणारी फुले दररोज तोडून फेकून द्यावी लागणार, लदबदून येणारी फुले येणाऱ्या जाणाऱ्याचे मन प्रसन्न करून जात होते. मात्र, या संकटाचा सामना करीत झाडांची वाईट स्थिती पाहण्यापेक्षा त्यांनी ही झाडे उपटून टाकली. घिरके यांना तीन मुले आहेत. सोबतच पत्नी, तीन सुना, नातवंडे असा त्यांचा परिवार आहे. फुल शेतीवर त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालत होता. 

अन् जड अंतःकरणाने सांगितले
मात्र, आता फुल विक्री बंद झाल्याने दैनंदिन खर्च भागवणे ही कठीण झाले आहे, असे त्यांनी मोठ्या जड अंतःकरणाने सांगितले. भविष्यातील उत्पन्नाला ब्रेक लागला असून, 2 एकरातील गहू, हळद, सोयाबीन यापासून मिळणाऱ्या उत्पन्नावरच त्यांचा घरखर्च सुरू आहे. उरलेल्या झाडांची फुले लॉकडाउन आटोपल्या नंतरच उत्पन्न मिळवून देतील. पण सध्या तरी त्यांनी ह्या फुलांचे आता काय करायचे या प्रश्नाचा शेवट करीत लदबदलेली फुलांची झाडे उपटून टाकली आहेत. कोरोनाने अनेकांना हवालदिल केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W Hockey: ४४ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! चीनला फायनलमध्ये हरवत भारताचा गोल्डवर कब्जा; थेट ऑलिम्पिकचं तिकीटही मिळवलं

Tukaram Mundhe Election Commissioner : तुकाराम मुंढे निवडणूक आयुक्त होणार? मुंबईच्या आंदोलनात कोणी केली मागणी

Electric Vehicle Policy: सरकारी योजना! इलेक्ट्रिक वाहनांवर १५ लाख रुपयांपर्यंतची सवलत; काय आहे नवीन स्कीम?

Latest Marathi News Live Update : जेलमध्ये टाकलं तर… अभिजीत दिपके म्हणाले मी पुन्हा येईन

Dive Agar Incident : 'चेहऱ्याची त्वचा खराब होईल म्हणून पाण्यात गेलो नाही आणि वाचलो'; प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याची व्यथा

SCROLL FOR NEXT