farming on the terrase 
विदर्भ

आश्‍चर्य… घराच्या स्लॅबवर धानाची शेती! कसे आहे शक्य ते वाचाच... 

श्रीकांत पेशट्टीवार

चंद्रपूर  : घराच्या स्लॅबवर फुल, झाड, वेल लावण्याचे प्रकार तुम्ही बघितला असालच. मात्र, एका मॉडर्न शेतकऱ्याने चक्क घराच्या स्लॅबवर धान पऱ्हे उगविण्याची किमया साधली आहे. एक दोन नव्हे तर 300 ट्रेमध्ये धानपऱ्हे फुलले आहेत. तीन एकर धानशेतीत या पऱ्ह्याची रोवणी केली. मुल तालुक्‍यातील चिखली येथील प्रमोद कडस्कर या शेतकऱ्याने हा नवा प्रयोग यशस्वी केला आहे. 

धान उत्पादक जिल्हा अशी चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. सावली, नागभीड, ब्रह्मपुरी, मुल तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात धानपीक घेतले जाते. कृषी क्षेत्रात नवेनवे प्रयोग सुरू आहेत. नवे तंत्रज्ञान कृषी क्षेत्राला विकसित करीत आहेत. मात्र, आजही अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीनेच शेती करतात. मूल तालुक्‍यात येणाऱ्या चिखली येथील प्रमोद कडस्कर या शेतकऱ्याने मात्र नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती उभी केली आहे. त्यात ते यशस्वी होताना दिसत आहेत. मुल तालुक्‍यात संगोपन शेतकरी उत्पादक प्रोड्यूसर कंपनी या भागातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात होणाऱ्या नव्या बदलांची माहिती देत असते. 

नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने तोट्यात चाललेली शेतीत नफा मिळवून देऊ शकते हेही कंपनीचे पदाधिकारी पटवून देत आहे. या कंपनीचा महेंद्र कंपनीशी करार केला आहे. या कंपनीने या हंगामात शेतकऱ्यांना अनुदानावर नवे यंत्र पुरविले. त्यात धान कापणी, धान रोवणी यंत्रासह अन्य यंत्र उपलब्ध करून दिले. या कंपनीने शेतकऱ्यांना ट्रेही पुरविले होते. याच ट्रेचा वापर किशोर कडस्कर यांनी धानाचे पऱ्हे लावण्यासाठी केला. सहसा धानाचे पऱ्हे शेतात, नर्सरीत टाकले जातात. मात्र, कडस्कर यांनी आपल्या घराच्या टेरेसवर तीनशे ट्रेमध्ये धानाचे बियाणे टाकले. जवळपास तीन दिवसांत अंकुर बाहेर आले. त्यानंतर त्यांनी धानपऱ्ह्याची शेतात रोवणी केली. 

शेतकरी संगोपन प्रोड्यूसर कंपनीने मूल तालुक्‍यात येणाऱ्या राजोली, मारडा, चिखली येथील शेतकऱ्यांना धान पऱ्हे उगविण्यासाठी प्लास्टिक ट्रेचे वाटप केले. अनेक शेतकऱ्यांनी शेतात, अंगणात या ट्रेमध्ये धानपऱ्हे उगविलेत. मात्र, चिखली येथील प्रमोद कडस्कर या शेतकऱ्याने चक्क घराच्या स्लॅबवर धानपऱ्हे टाकलेत. तीनशे ट्रेमध्ये त्यांनी धानाची बिजाई टाकली. तीन दिवसांनंतर ट्रेमध्ये अंकूर दिसू लागलेत. प्रत्येक ट्रेमधील पऱ्हायांना पाणी पोहोचेल, अशी सुविधा त्यांनी केली. पंधरा ते वीस दिवसांत ट्रेमधील पऱ्हे रोवणीयोग्य झाले. तीनशे ट्रेमधील धानपऱ्ह्यांची रोवणी तीन एकर शेतीत केली. 

जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग 

टेरिसवर धानपऱ्हे उगविण्याचा जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग होता. हा प्रयोग यशस्वी झाल्याने भविष्यात शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यंदा कृषी विभागाने शेतकऱ्यांना मानव विकास योजनेतून धान कापणी, धान रोवणी यंत्र अनुदानावर दिले आहे. या यंत्राच्या मदतीने धान रोवणीची कामे होत आहे. यातून मजुरीचा खर्चही वाचला आहे. 

संपादन : राजेंद्र मारोटकर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खोपोलीत शिंदेसेनेच्या नेत्याची निर्घृण हत्या; तलवार-विळ्यासह कुऱ्हाडीने सपासप वार, अजितदादांच्या 10 पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

Unnao Case : हायकोर्टाचा निर्णय विकृत अन् कायद्याविरोधात; कुलदीप सेंगरच्या जामीनाला CBIचं सुप्रीम कोर्टात आव्हान

रोहित शर्मा, विराट यांचे VHT मधील दोन सामने झाले; आता कोणत्या तारखेला पुन्हा मैदानावर दिसणार? कोहलीच्या निर्णयाने सारे चकीत

Mumbai Municipal Election : मुंबईत ‘ठाकरे ब्रँड’ची ताकद पणाला! विभागप्रमुखांऐवजी उमेदवारीची सूत्रे थेट ‘मातोश्री’, ‘शिवतीर्था’वर

MPSC Exam : हजारो विद्यार्थी अपात्रतेच्या उंबरठ्यावर! पीएसआय पदासाठी वयोमर्यादा गणनेची अट; एक संधी देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT