Farmers are in fear of Offseason rain in Amravati  
विदर्भ

अवकाळी पावसाच्या अंदाजाने शेतकरी धास्तावला; गहू आणि हरभरा उत्पादकांसमोर पुन्हा संकट

क्रिष्णा लोखंडे

अमरावती ः हवामान खात्याने दिलेल्या अवकाळी पावसाच्या अंदाजाने गहू व हरभरा उत्पादक शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे पोळलेल्या शेतकऱ्यांसमोर या अंदाजाने पुन्हा एकदा संकट उभे ठाकले आहे.

यावर्षी खरीप हंगामात पावसामुळे सोयाबीन, कापूस, मूग व उडदासह तुरीचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील गहू व हरभऱ्यावर शेतकऱ्यांची भिस्त अवलंबली आहे. हरभऱ्याची पेरणी यंदा गव्हाच्या तुलनेत अधिक असून काही भागांतील हरभरा कापणीवर आला आहे, तर काही ठिकाणी तो विक्रीसही आला आहे. गव्हाची पेरणी आटोपली असून काही भागांतील गहू ओंबीवर आला आहे. गव्हाला सर्वाधिक धोका गारपिटीचा असून अवकाळी पावसासोबत गारपिटीचीही शक्‍यता वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांचे हार्टबिट वाढले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील गेल्या काही दिवसांत वेर्स्टन डिस्टर्बंसमुळे खाली उतरलेले तापमान आता पुन्हा चढू लागले आहे. दक्षिणेकडून वारे वाहण्यास सुरुवात झाल्याने तापमानात वाढ होऊ लागली आहे. मध्य महाराष्ट्रावर 900 मीटर उंचीवर वाहत असलेले चक्राकार वारे आणि येथून केरळपर्यंत असलेली कमी दाबाची द्रोणीय स्थिती, सोबतच पूर्वेकडून हवेच्या खालच्या स्तरात वाहत असलेले बाष्पयुक्त वारे, या सर्व हवामान शास्त्रीय परिस्थितीमुळे 16 व 17 फेब्रुवारीला विदर्भात तुरळक ठिकाणी गडगडाट आणि विजांसह हलक्‍या मध्यम पावसाची शक्‍यता आहे. तसेच एखाद दोन ठिकाणी गारपीट होण्याची शक्‍यता आहे.

वातावरणातील बदल शेतकऱ्यांच्या मुळावर उठला असून 16 फेब्रुवारीस पूर्व विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तर 17 व 18 फेब्रुवारीस पश्‍चिम विदर्भ व मराठवाड्यातील काही ठिकाणी वादळी पाऊस राहील. तसेच तुरळक भागात गारपिटीची शक्‍यता आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup, IND vs PAK: 'आम्ही कोणत्याही संघाला...', भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या कर्णधाराने दिली वॉर्निंग

विकासासाठी शांतता हवी, मणिपूरमधील संघटनांना पंतप्रधान मोदींचं आवाहन; राज्यातील परिस्थितीवरही बोलले

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचा वापर मतांच्या राजकारणासाठीचं, निवडणुक जवळ आली पाणीप्रश्‍न पेटला; स्थानिक नेत्यांकडून जनतेच्या समस्यांना केराची टोपली

Charlie Kirk: ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क यांच्या हत्येप्रकरणी एफबीआयने संशयिताला ताब्यात घेतले

IPS Anjana Krishna : 'IPS अंजना कृष्णा यांना दिली खोटी माहिती'; कुर्डूत 200 ट्रक वाळूचा दावा ठरला फोल, महसूल अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT