crop loan.
crop loan. 
विदर्भ

शेतक-यांना आता पीककर्जाची वाट; यंदा 2 हजार कोटींवर पीककर्जाचे उद्दीष्ट

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ  : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार 182 कोटी 52 लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे टार्गेट ठरविण्यात आले आहे. पीककर्ज वाटपाचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

सन 2020-2021 या वर्षातील खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाचा आराखडा जिल्हा अग्रणी बँकेमार्फत तयार करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या खरीप हंगामात जिल्ह्यात दोन हजार 182 कोटी 52 लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यामध्ये 2020-2021 या वर्षातील खरीप हंगामात जिल्ह्यातील दोन लाख 98 हजार 933 शेतकऱ्यांचा समावेश आहे.      कोरोनामुळे सध्या बँकांच्या वेळा सकाळी आठ ते दुपारी 12 पर्यंत करण्यात आल्या आहेत. बँकेत शेतकरी सन्मान निधी व जनधन खात्यातील रक्कम काढण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे अजून तरी पीककर्ज वाटपाला गती आलेली नाही.   बँकेकडून सर्व शाखांना कर्जवाटपासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंग ठेवून बँकांना व्यवहार करावा लागणार आहे. असे असले तरी लॉकडाऊनमुळे शेतकरी अजून तरी बँकेपर्यंत पोहोचलेला नाही. लॉकडाऊन उघडल्यानंतरच शेतकरी बँकेत पोहोचण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मे महिन्यात बँकेमध्ये पीककर्जांसाठी शेतकऱ्यांची गर्दी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
बँकनिहाय खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट
बँक                                     शेतकरी                         रक्कम(कोटीमध्ये    
राष्ट्रीयकृत बँका-                    1,86,765                             1,370 कोटी
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक-     73,073                                548कोटी
ग्रामीण बँक                           24,804                             163 कोटी 94 लाख
खासगी बॅंका                          14,291                                 100 कोटी
सविस्तर वाचा - माहिती लपवून समाजाचे शत्रू बनू नका : तुकाराम मुंढे

राष्ट्रीयकृत बँकांवर "वॉच'
पीककर्ज वाटपात राष्ट्रीयकृत बँकांची टक्केवारी कमी असते. दोन वर्षांपूर्वी तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बँकांना वठणीवर आणण्यासाठी कठोर भूमिका घेतली होती. त्यामुळे कर्जवाटपाची टक्केवारी वाढली. गेल्या वर्षी बँकांनी समाधानकारक कर्जवाटप केले. यंदाही राष्ट्रीयकृत बँकांनी याच पद्धतीने वाटप करण्याची गरज असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT