farmer  
विदर्भ

दुर्दैवी! विजेच्या प्रतीक्षेत बळीराजा स्वतःच्या जीवावर झाला उदार; श्‍वापदांच्या सावटात पिकांना पाणी 

राहुल मैद

ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : दिवसभर काबाडकष्ट केल्यानंतर मनुष्याला रात्रीच्या निवांत झोपेची नितांत गरज असते. रात्रीची पुरेशी झोप दुसऱ्या दिवशी ताजेतवाने करते. मात्र ब्रह्मपुरी तालुक्‍यातील बळीराजाला डोळ्याला रात्रीची झोप नाहीच. शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी विजेच्या प्रतीक्षेत रात्रभर त्याला जागावे लागत आहे. ते जंगली श्‍वापदांच्या सावटात. कृषीपंपाचा वीज पुरवठा दिवसा बंद असतो आणि रात्री सुरू असतो. त्यामुळे दिवस आणि रात्र बळीराजाच्या डोळ्याला डोळा लागत नाही.

भारनियमनामुळे शेतीसाठी  आळीपाळीने आठवड्याभरात दिवस -रात्र असा वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे शेतात पाणी देण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांना कुटुंबासह रात्र जागून काढावी लागत आहे. 

या परिसरातील बहुतांश शेतजमीन जंगलव्याप्त आहे.  त्यामुळे रात्री वन्यजीवांच्या दहशतीत शेतकऱ्यांना काम करावे लागते. शासनाने आता तरी बळीराजासाठी असलेली भारनियमाची रात्रीची चेष्टा थांबवावी. तांत्रिक अडचणी दूर करून अधिक दाबाने वीज पुरवठा सुरू करावा, अशी मागणी ब्रह्मपुरी तालुक्‍यातील बळीराजा करीत आहे. 

हिंस्र पशूंची भीती

ब्रह्मपुरी तालुका चोहोबाजूंनी जंगलाने व्यापलेला आहे. त्यामुळे या भागात वाघ, बिबट,रानडुकर, अशा हिंस्र पशूंचा वावर नित्याचीच बाब झाली आहे.  अशावेळी रात्री जीव मुठीत घेऊनच पिकांना पाणी द्यावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी  शेतीला दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी तालुक्‍यातील बळीराजा करीत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT