Farmers cultivate lemons through hard work in Wardha
Farmers cultivate lemons through hard work in Wardha 
विदर्भ

Success Story : पारंपरिक पीकपद्धतीला फाटा देत फुलविली लिंबाची शेती; वर्षाला चार लाखांचे उत्पादन

यशवंत वांदिले

सेलू (जि. वर्धा) : पारंपरिक पीकपद्धतीला फाटा देत बोरी (कोकाटे) येथील पंढरी जुगनाके या प्रयोगशील शेतकऱ्याने नियोजन व परिश्रमातून लिंबाची शेती फुलविली आहे. कुठल्याही पिकातून चांगले उत्पादन घेता येते, असा आदर्श त्यांनी शेतकऱ्यांसमोर निर्माण केला आहे. सेलू तालुक्‍यात लिंबूवर्गीय फळाचे पीक चांगल्या प्रकारे घेतले जाऊ शकते, हे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे.

तालुक्‍यातील बोरी (कोकाटे) येथील पंढरी जुगनाके यांनी बोरी बोरधरण शिवारातील शेतीमध्ये तांत्रिक मार्गदर्शन व योग्य नियोजन करून लिंबाची लागवड केली. पारंपरिक शेती व रासायनिक खताचा वापर न करता नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब नियोजन केले. पंढरी जुगनाके यांच्याकडे सतरा एकर जमीन आहे. तूर, कपाशी, सोयाबीन अशी पारंपरिक शेती करताना उत्पादन खर्च व उत्पादन याचा ताळमेळ बसत नव्हता.

शेतीमध्ये वारेमाप रासायनिक खताचा वापर होत असल्याने जमिनीची पोत तर बिघडतच होती व उत्पादन खर्चही वाढत होता. त्यामुळे शेतीवरील खर्च कमी करून त्यांनी सेंद्रिय शेतीचा विचार केला. यातूनच शेणखताचा वापर करून लिंबू पिकाची निवड केली. हा प्रयोग तालुक्‍यातील शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरत आहे.

प्रत्यक्ष उत्पादन पाच वर्षांनंतर सुरू होणार असल्याने त्यांनी फक्त देखभाल सुरू ठेवली. यावर्षीपासून उत्पादन सुरू झाले असून ते उत्पादन विक्रमी ठरत आहे. लिंबाचे उत्पादन ३५ वर्ष चालणार असून, शेणखत व मजुरी असा पन्नास हजार रुपये खर्च आहे. तर चार लाखांचे उत्पादन झाले आहे. लिंबाच्या पिकाला वन्यप्राणी व माकडांचा त्रास नसल्याने पिकांचे नुकसानही टळले आहे.

सहा एकराला ३५ हजारांचा खर्च

शेतकरी पंढरी जुगनाके यांनी २०१३ मध्ये सहा एकर जमिनीची निवड करून ५०० रोपट्यांची लागवड केली. यानंतर २०१५ मध्ये पुन्हा पाचशे झाडांची लागवड केली. यासाठी संपूर्ण खर्च ३५ हजार रुपये आल्याचे त्यांनी सांगितले. यंदा त्यांना चार लाखाचे उत्पादन झाले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: पंतप्रधान मोदींनी रॅलीदरम्यान महिलेचे केले चरण स्पर्श; कोण आहेत 80 वर्षीय पूर्णमासी जानी?

Pune Rain Updates : पुण्यात वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात

Water Issue : मराठवाड्याचा पाणी प्रश्न पेटला; धरणात जलसमाधीसाठी जात असलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवले

PM Modi Ban: "PM मोदींना 96 तास प्रचारासाठी बंदी घाला"; सिव्हिल सोसायटी गटांची निवडणूक आयोगाकडं तक्रार

शक्तिशाली सौर वादळाची पृथ्वीला धडक; भारतातील लडाखसह युरोपीय देशांमध्ये विहंगम दृश्य

SCROLL FOR NEXT