dhaba. 
विदर्भ

आधुनिक शेतीची कास धरणारा शेतकरी आजही जपतो नागरी आणि इद्रीची परंपरा

निलेश झाडे

धाबा(जि. चंद्रपूर) : कसदार आणि भरपूर पीक यावे यासाठी बळीराजाने आधूनिक शेतीची कास धरीत प्रगती साधली आहे. अगदी नांगरणी, मशागतीसाठीही शेतकरी नवीन तंत्रज्ञानाचा आणि नवनवीन यंत्रांचा उपयोग करीत असतो. मात्र तरीही काही प्रथा परंपरांचा पगडा शिक्षित झाल्यानंतरही माणसाच्या मनावर कायम असतो. कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठं या नवीन शेती पद्धतीविषयी बळीराजाला सतत प्रोत्साहन देत असतात. या सगळयाचा परीणाम म्हणून बळीराजाने परंपरागत शेती सोडली असली तरी शेतीशी जुळलेल्या पुरातन काळापासून चालत आलेल्या मात्र परंपरा सोडल्या नाहीत. कारण शेती तंत्रज्ञान जरी नवीन असले तरी पीकाचे अवलंबित्व अजूनही निसर्गावरच आहे. कधी ओला तर कधी सुका दुष्काळ, कधी जंगली श्‍वापदांमुळे होणारे नुकसान अशा अनेक अडचणींचा सामना आजही बळीराजाला करावा लागतो. त्यामुळे निसर्गाशी जोडलेल्या परंपरांचे पालन शेतकरी आजही तितक्‍याच श्रद्धेने करतो.
उन्हाच्या ऐन तापत्या झळांमध्ये आपण जेव्हा दारे बंद करून घरात बसतो तेव्हा शेतकरी घामाच्या धारांमध्ये न्हाऊन शेतात राबत असतो. नांगरणी वखरणी करीत असतो.

सविस्तर वाचा - नागपुरात नगरसेवक घरीच विलगीकरणात

हजारो वर्षापासून सुरू असलेली " नागरी " आणि " इद्री " या परंपरांची जोपासना ग्रामीण भागात आजही केली जाते. नागरी झाल्याशिवाय शेतात नांगर टाकले जात नाही तर इद्री आटोपल्यावरच शेतात बियाणाची पेरणी केली जाते. विज्ञानाचे बोट धरुन बळीराजाने शेतीचा कायापालट केला. आधुनिकतेच्या वाटेवर चालतांना पुर्वंजाची परंपराही बळीराजा जोपासून आहे. मे महिन्याचा पहिल्या आठवड्यात नागरीचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर शेतकऱ्यांनी नांगरणी उरकवली. मान्सूनची चाहूल लागली आहे. मंगळवारला इद्रीचा कार्यक्रम पार पडला. अन मध्यरात्री बियाणाची पुडी प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी पोहोचली आहे. बळीराजाला आता पावसाची प्रतीक्षा आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT