विदर्भ

कृषी विभागाला बांधाची ‘अ‍ॅलर्जी’; कास्तकारांत नाराजी

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : गेल्यावर्षी बोंडअळीने उद्ध्वस्त झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या अपेक्षेने कपाशी व सोयाबीन या पिकांची लागवडीसह पेरणी केली. पीक वाढत असतानाच बोंडअळी, मावा, तुडतुडा आदी कीडींनी आक्रमण केले. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मदार ही खरीप हंगामातील पिकांवरच असते. मागील काही वर्षांपासून खरीप हंगामच शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा ठरत आहे. यंदाही शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होत पिकांची लागवड केली. पिकांची वाढ होत असताना किडीने आक्रमण केले. यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी फवारणी करीत आहेत. मात्र, त्याचा कोणताही फायदा होताना दिसत नाही.

बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जाते. कृषी केंद्रचालक आपल्याच मर्जीप्रमाणे शेतकऱ्यांना औषधी देतात. त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसत आहे. या संकटात शेतकरी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून मार्गदर्शन मागत आहेत. परंतु, कृषी विभागाकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नसल्याचा आरोप केला जात आहे. मागील वर्षी बोंडअळीमुळे नुकसानीची मदत मिळाली नाही. त्यामुळे आत्महत्या करायची का, असा प्रश्‍न शेतकरी विचारत आहेत.

मागील वर्षी बोंडअळीने कपाशीचे अतोनात नुकसान केले. यंदाही तीच परिस्थिती दिसत आहे. कृषी विभागाचे अधिकारी बांधावर येऊन पाहणी करणे सोडाच साधे मार्गदर्शनही करीत नाहीत. फवारणी करूनही फायदा होत नसल्याने शेतकऱ्यांना नवीनच चिंता सतावत आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन केला असता, त्यांनी एका बैठकीत असल्याचे सांगून बोलणे टाळले.

शेतकऱ्यांचा वाली कोण?

कोरोना संकटाच्या काळात जगाचे चक्र थांबले असताना शेतकरी शेतात घाम गाळून अन्न पिकविण्यात व्यस्त होता. हाच शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात दरवर्षी भरडला जात आहे. यंदाही किडीच्या आक्रमणाने पिच्छा सोडलेला नाही. कुणीही शेतकऱ्यांच्या बाजूने बोलायला तयार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाली कोण, असा प्रश्‍न यानिमित्ताने निर्माण होत आहे.

मागील वर्षी शेतकऱ्यांना बोंडअळीने उद्ध्वस्त केले. हेक्टरी एक क्विंटलही कापूस निघाला नाही. सीड्स कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. शेतकरी जोपर्यंत घरचे बियाणे वापरत होते. तोपर्यंत कोणतीही कीड पिकांवर येत नव्हती. बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे. मागील वर्षी व यंदाही हेक्टरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी.
- अनुप चव्हाण, शेतकरी, बोथबोडन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Farmer Loan Waiver 2026 : : जळगावच्या 45 हजार शेतकऱ्यांचे नशीब फळफळणार! सरकारने मागवली माहिती; शेतकरी कर्ज निवारण योजनेचा असा होणार फायदा!

Pune Accident: पिकअप व बोलोरोच्या धडकेत एक ठार, 9 गंभीर जखमी; अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील घटना, अंधारात काय घडलं!

Kagal Check Post Accidents: कागलमध्ये नाक्यावर अपघातांची मालिका, चेक पोस्ट व्यवस्थापनाचे दुर्लक्ष; बॅरिकेडस्‌मुळेच अनेक अपघात

Mumbai Local : मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा, विक्रोळीजवळ तांत्रिक बिघाड; लोकल ३० ते ४० मिनिटं उशिरा, स्थानकांमध्ये गर्दी

South Africa vs West Indies: दक्षिण आफ्रिका वेस्ट विंडीज लढत भारतासाठीही महत्त्वाची; उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना

SCROLL FOR NEXT