विदर्भ

वीज बिलांची वसुली करा; पण, शेतकऱ्यांसोबत इंग्रजांसारखे वागू नका

अरुण जोशी

अमरावती : शेतकऱ्यांकडून वीज बिल वसुली करताना सहानुभूतीचा दृष्टिकोन ठेवा. इंग्रजांसारखे वागू नका, असा सज्जड इशारा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. शुक्रवारी अमरावती वीज विभागातील अधिकाऱ्यांच्या विविध विभागांची आढावा बैठक पार पडली. यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना देत कानउघाडणीही पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केली. (Farmers-Recovery-of-electricity-bill-Warning-the-authorities-Guardian-Minister-Yashomati-Thakur-nad86)

अमरावतीतील शेतकऱ्यांकडून वीज बिल वसुली करताना सर्व रक्कम घेण्याचा तगादा अधिकाऱ्यांकडून लावला जातो. पैसे न दिल्यास शेतकऱ्यांची वीज जोडणी कापली जाते, अशा अनेक तक्रारी पालकमंत्री ठाकूर यांच्याकडे आल्या होत्या. याचा पाठपुरावा त्यांनी केला. सततच्या पावसामुळे पूर आला. या पावसात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यामुळे ते हवालदिल झाले आहेत, असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.

पुरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, ते आर्थिक अडचणीत आहेत. अशावेळी त्यांना पैशांसाठी त्रास देऊ नका. शेतकऱ्यांकडे जी रक्कम असेल ती घ्या. पैशासाठी तगादा लावून वीज कापू नका. ऊर्जा विभागावर ताण येत आहे, याची माहिती आहे. मात्र, वीज बिल वसुली करताना शेतकऱ्यांसोबत इंग्रजांसारखे वागू नका. शक्य तितक्या नम्रतेने वागा, अशी सूचना यशोमती ठाकूर यांनी वीज विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या.

शेतकऱ्यांवर दबाव टाकू नका

सद्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे. शेतातील पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. अशावेळी कोणीही शेतकऱ्यांची वीज कापणार नाही. वीज कापली तर गोंधळ होईल. हे मुळीच खपवून घेणार नाही. कोणीही शेतकऱ्यांवर पैशांसाठी दबाव टाकणार नाही. शेतकऱ्यांसोबत नम्रतेने वागा. जे देईल, जितके देईल तितकेच पैसे द्या. नंतर पुन्हा पैसे घ्या. परंतु, दबाव टाकू नका, असेही पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.

खेळांमध्ये राजकारण आणू नका

अमरावती विभागीय क्रीडा अधिकाऱ्यांची ठाकूर यांनी चांगलीच कानउघाडणी केली. अमरावती विभागीय क्रीडा संकुलात नेमलेल्या प्रशिक्षकांच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त केली. परस्पर नेमणुका केल्यामुळे पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. विभागीय क्रीडा संकुलामध्ये कोणत्याही पद्धतीचा हलगर्जीपणा असू नये तसेच खेळांमध्ये कोणत्याही पद्धतीचे राजकारण आणू नये, अशी सूचना आणि आदेश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले. अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार न करता खेळाच्या आणि खेळाडूंच्या हिताचा विचार करून विभागीय संकुलामध्ये कारभार करावा. अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशाराही ठाकूर यांनी दिला.

(Farmers-Recovery-of-electricity-bill-Warning-the-authorities-Guardian-Minister-Yashomati-Thakur-nad86)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT