अमरावती - अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सिद्धनाथपूर येथील 47 वर्षीय सुधाकर महादेवराव पाटेकर यांनी बुधवारी (ता.13) विषप्राशन केले. उपचारादरम्यान आज गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. सुधाकर पाटेकर यांना तीन मुली, एक मुलगा आहे.
तीन एकर शेती असून यावर्षी सोयाबीन लागवड केली होती. पण पावसामुळे सोयाबीन खराब झाले. बँकेचं कर्ज सुद्धा या शेतकऱ्यावर आहे. त्यामुळे याला त्वरित मदत मिळावी या करीता गावकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात मृतदेह घेऊन आले व मदतीची मागणी केली. अप्पर जिल्हाधिकारी संजय पवार यांनी मदतीची मागणी मान्य केल्यानंतर शेतकऱ्यांनी हा मृतदेह उचलत गावी नेला. तब्बल 20 मिनिट जिल्हाधिकारी परिसरात हा मृतदेह पडून होता.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.