Farmers suicides main reason is water says folk poet Dr Vitthal Wagh
Farmers suicides main reason is water says folk poet Dr Vitthal Wagh 
विदर्भ

शेतकरी आत्महत्येचे मुळ पाण्यात : लोककवी डॉ. विठ्ठल वाघ

सकाळवृत्तसेवा

अकोला : शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी मंगळवारी (ता. 19) अन्नत्याग करण्यात आले. जलयुक्त शिवारचा गवगवा करणाऱ्या सरकारकडून शेती सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न अपूरे आहेत. नेर-धामना बॅरेज, घुंगशी बॅरेज, रोहणा बॅरेज आदी शेती सिंचनाचे प्रकल्प अर्धवट आहेत. शेतकरी आत्महत्येचे मुळ हे पाण्यात आहे. शेतीला सिंचनाची व्यवस्था झाली तरी शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न सुटू शकतो, असे मत लोककवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी व्यक्त केले. 

बळीराजा जलसंजिवनी योजनेतून 1900 कोटी रुपये मंजुर करण्यात आले. मात्र, सिंचनाची कामे अपूर्ण असल्याने महान प्रकल्पावर सिंचनाचा ताण येत आहे. तर महान प्रकल्पातून सिंचनासाठीचे नसल्याचे मत शेतकरी नेते मनोज तायडे यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांनी एकत्र येवून सामूहीकरित्या प्रक्रीया उद्योग स्थापन करणे गरजेचे असल्याचे मत सुभाष काशिद यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी, सर्व शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

यावेळी जगदीश मुरुमकार, डॉ. संजय भवाने, भगवान बहाकर, डॉ. प्रवीण गायगोळ, दिलीप तांगसे, संजय ढाकरे, भाई रजनीकांत, ज्ञानेश्वर वर्गे, राजू पाटील बढे, चंदूभाऊ रेवस्कार, वसंतराव उजाडे, डॉ. कृष्णमुरारी शर्मा, पुरुषोत्तम आवारे, ज्ञानेश्वर गावंडे, दीपक गावंडे, स्वप्नाताई लांडे-साकरकार आदींची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

International Labour Day : राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे का? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT