Farmer loan Farmer loan
विदर्भ

शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकू लागला; पावसामुळे हवालदिल

कृष्णा लोखंडे

अमरावती : सोयाबीन पीक काढणीच्या ऐन हंगामात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकू लागला आहे. सप्टेंबर महिन्यातील सततच्या पावसाने पिकांच्या उत्पादनाची सरासरी घसरण्यासोबतच प्रतवारीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान हवामान खात्याने पाऊस लवकर थांबणार नसल्याचा अंदाज वर्तविला आहे.

अमरावती विभागात सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत एकूण २४१ मिमी पाऊस बरसला आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत तो सरासरी २०४.६ टक्के झाला आहे. गतवर्षी आतापर्यंत विभागात ७७१.९ मिमी पाऊस झाला होता. यंदा याच कालावधीत १०६ मिमी पाऊस अधिक झाला आहे. मूग, उडीद व सोयाबीन काढणीचा हा हंगाम आहे. बऱ्याच ठिकाणी सोयाबीन काढणी सुरू झाली असून नवीन सोयाबीन बाजारात आला आहे. अशावेळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. उत्पादनाच्या सरासरीसोबतच प्रतवारी घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गतवर्षी सोयाबीनची उत्पादकता ८ क्विंटलपर्यंत होती. यंदा ती १३ क्विंटलपर्यंत जाईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. मात्र, हा अंदाज आता खोटा ठरू लागला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत सर्वाधिक पावसाची नोंद यवतमाळ जिल्ह्यात १०४२ मिमी तर बुलडाणा ७४२ मिमी, अकोला ७५७ मिमी, वाशीम ९७८ मिमी, अमरावती ८३५ मिमी पाऊस झाला आहे.

उत्तर बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाले असून, हवामान खात्याने याचे नामकरण गुलाब असे केले आहे. सदर वादळ पश्चिम-वायव्य दिशेने वाटचाल करत छत्तीसगड तेलंगणा मार्गाने विदर्भाकडे वाटचाल करण्याची शक्यता आहे. परंतु, जमिनीवर पोहोचल्यावर या वादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. तरी सुद्धा या वादळाच्या प्रभावामुळे विदर्भात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
- प्रा. अनिल बंड, हवामान तज्ज्ञ

यंदाही दुष्काळच

यंदा सोयाबीनचे उत्पादन चांगले होऊन चढे भाव मिळेल अशी आशा होती. मात्र, सप्टेंबर महिन्यातील पावसाने नको त्यावेळी येऊन नुकसान केले आहे. नवीन सोयाबीन काढणी सुरू असून, बाजारातील स्थिती बघता भाव मिळणार नाही, अशी व्यथा किसनराव कुऱ्हाडे या शेतकऱ्याने व्यक्त केली.

उत्पादकता घसरण्याची शक्यता

पावसाचे प्रमाण बघता गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनची उत्पादकता घसरण्याची शक्यता आहे. सद्या काही ठिकाणी काढणी सुरू आहे. मात्र, उत्पादनाची सरासरी घसरलेली असल्याचे दिसून येऊ लागले आहे, असे प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena SC Hearing LIVE Updates : आधी आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न निकाल, मग पक्ष कुणाचा ते ठरेल, कपिल सिब्बल यांच्या युक्तिवाद

Death Penalty: फाशी नको, इंजेक्शन देऊन मृत्यू द्या! जनहित याचिकेतून मागणी, सुप्रीम कोर्टाने घेतला मोठा निर्णय

Third Mumbai: १२४ गावात उभं राहणार नवं शहर, सिंगापूरच्या धर्तीवर उभारणार मुंबई ३.०; राज्य सरकारचा मास्टरप्लान

बॉयफ्रेंडसाठी पत्नीने करोडपती नवऱ्यासह ५ वर्षांच्या मुलाला संपवलं, घरातले CCTV बंद करून रचला कट; दोघांना अटक

Mira-Bhayandar: व्यावसायिक मालमत्तांना निवासी दराने कर आकारणी, मिरा-भाईंदर पालिकेचा कारभार वादात

SCROLL FOR NEXT