YAT18P01_Main 
विदर्भ

एकाच बैलाच्या साहायाने केली शेतीची कामे

तुषार अतकारे

वणी (जि. यवतमाळ) : दिवसेंदिवस शेतात उत्पन्न होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतीकरिता लागणाऱ्या बैलाची किंमत वाढतच चालली आहे. त्यातच बैलांच्या चारा पाण्यावर होणारा खर्च परवडणारा नसल्याने शेतकरी बैल विकत आहेत. मात्र, चनाखा येथील शेतकऱ्याने नवीन प्रयोग करून दहा एकर शेतीची नांगरणी व पेरणी एकाच बैलाच्या साहायाने केली आहे.

मागील वर्षी सुरुवातीला पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांना दुबार व तिबार पेरणी करावी लागली होती. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. त्यावरही मात करून शेतकऱ्यांनी शेतात पिके उभी केली. पीक हातात येण्याच्या वेळी परतीच्या पावसाने हजेरी लावून हातातले पीक हिरावून नेले होते. शिवाय कोरोना आजारामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अवश्य वाचा :  काकूच्या प्रेमात आकंठ बुडाला पुतण्या, काका ठरत होता अडसर... मग...

खरिपाची पेरणी कशी करावी, या विवंचनेत शेतकरी दिसत आहे. शेती करण्याकरिता खरी आवश्‍यकता आहे ती बैलाची. मात्र, बैलजोडीच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांच्या आवाक्‍याबाहेर आहेत. त्यातच त्यांच्या पालन पोषणाचाही खर्च झेपत नसल्याने अनेक शेतकरी बैलजोडी विकून भाडेतत्त्वावर शेतीची पेरणी करीत आहेत.

या काळात दोन बैलांचे पालन पोषण करणे कठीण झाले आहे. या वर्षी काहीतरी नवीन प्रयोग करावा, अशी मनात कल्पना असली आणि मी एका बैलावर शेती करण्याचा निर्णय घेतला माझ्या शेतातली पेरणी पूर्ण झाली आहे. मी माझ्या पद्धतीने शेतीला लागणारे यंत्र तयार करून घेतले आहे. या प्रयोगामुळे माझी बचत झाली असून, शेतकऱ्यांनी एका बैलावर शेती करण्यास काही अडचण नाही.
संगीत ढवस, शेतकरी, चनाखा (जि. यवतमाळ).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, दुष्काळासंदर्भात केल्या १७ मागण्या

Premanand Maharaj Disciple Death : आश्रमाच्या छतावरून खाली पडले अन् मृत्यू; प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ कायम

Competitive Exam Success Story: जिद्द, चिकाटी अन् मेहनतीला यशाची साथ; तीन माजी विद्यार्थ्यांची यशाला गवसणी, जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीचा महापराक्रम! तेंडुलकरनंतर वन डेत असा विक्रम नोंदवणारा पहिलाच; शुभमन गिलचेही शतक

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

SCROLL FOR NEXT