uposhan sangrampur.jpg 
विदर्भ

गावाच्या समस्यांना झाले त्रस्त; त्यांनी चक्क 20 फुट विहिरीत सुरू केले उपोषण

सकाळ वृत्तसेवा

संग्रामपूर (जि.बुलडाणा) : येथील नगरपंचायत मधील माजी नगराध्यक्ष यांचे वार्ड मधील विविध समस्याबाबत दोन तरुणांनी विहिरीत 20 फुट खोलीवर 4 मार्चचे पहाटे 2 वाजता पासून उपोषणाला सुरुवात केली आहे.
  
संग्रामपूर शहरामध्ये नांदुरा अर्बन बँकजवळ तहसील कॉर्टरच्या विहिरीमध्ये रात्री 2 वाजता उपोषणाला सुरुवात झाली आहे. वार्ड क्रमांक 7 मधील विविध मागण्या पूर्ण होई पर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये तहसील कॉर्टरचे सांडपाणीमुळे होत असलेला त्रास, नाल्यांचे काम अपूर्ण असल्याने सर्वत्र असलेली   अस्वच्छता पाहता नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. वार्डात सिमेंटचा पक्का रस्ता नसल्याने पावसाळ्यात नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

माता रमाई घरकुल योजनेचे पैसे थकीत असल्याने लाभार्थी अडचणीत आले आहेत. ते पैसे लवकर मिळाले पाहिजेत. अश्या मागण्यांना घेऊन सौरभ बावस्कर आणि विकी भटकर या दोन तरुणांनी रात्रीचे पहाटे उपोषणाला सुरुवात केली आहे. जो पर्यंत ह्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत, तो पर्यंत उपोषण सुरूच राहणार असेही बोलताना सांगितले आहे. विहिरीत उपोषनास बसल्याने चांगलीच चर्चा रंगत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa US Rules : डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक मोठा झटका देण्याच्या तयारीत; H-1B व्हिसा पूर्णपणे बंद होणार?

Rohit Sharma Video: रोहित टीम बसमधून उतरताना पाय घसरून पडला, पोलिसांसह सारे सावरायला धावले; विराट लांब उभा राहून फक्त...

दुष्काळाच्या झळा! सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Vivo X Fold 6 ची भारतात एन्ट्री! 'या' दिवशी होणार लाँच; 200MP कॅमेरा अन् 7000mAh बॅटरीसह मिळणार दमदार फीचर्स!

Badminton Association: महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या अध्यक्षपदी अरुण लखानी

SCROLL FOR NEXT