crime 
विदर्भ

दवाखान्यातून घरी परतणाऱ्या डॉक्‍टरवरच केला त्यांनी जीवघेणा हल्ला!

सकाळ वृत्तसेवा

नांदगावपेठ (अमरावती) : समाजसेवा करणाऱ्या डॉक्‍टरवरच काहींनी हल्ला चढवत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली. अजून हल्ल्याच्या कारणाचा आणि हल्लेखोरांचा शोध लागलेला नाही. रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्‍टरचे कोणाशी काय वैर असावे, असा प्रश्‍न सगळ्यांच्या मनात उपस्थित होत आहे.
गेल्या 20 वर्षांपासून आपल्या खासगी रुग्णालयात रुग्णसेवा करणारे डॉ. संजय रोडे. नेहमीप्रमाणेच दवाखाना आटोपून रात्री 10 वाजता ते अमरावती येथे घरी परतत होते. अचानक पाच ते सहा युवकांनी वाहन अडवून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी (ता. 27) रात्री दहा वाजताच्या सुमारास बाजार ते टोलनाका मार्गावर घडली. डॉ. रोडे गंभीर जखमी झाले असून घटनेनंतर हल्लेखोरांनी तत्काळ बिझीलॅण्डच्या दिशेने शेतातून पळ काढला.
डॉ. संजय रोडे यांचे नांदगावपेठ येथे खासगी रुग्णालय असून मागील 20 वर्षांपासून ते याठिकाणी अविरत सेवा देत आहेत. कोरोनासारख्या गंभीर आजारातसुद्धा ते रुग्णांना कायम सेवा कायम देत होते. बुधवारी रात्री उशिरापर्यंत रुग्णतपासणी करून ते त्यांच्या वाहनाने अमरावती येथे जाण्यासाठी निघाले. दहा वाजेदरम्यान बाजार ते टोलनाका रस्त्यावर कब्रस्तान जवळ पाच ते सहा युवकांनी त्यांचे वाहन अडवून त्यांना लाठीकाठीने व लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. एकाने त्यांना मारायला दगड आणला, मात्र त्यातील एकाने पंकज नको मारू, असा आवाज दिल्याने त्याने दगड गाडीच्या काचेवर मारून तेथून पळ काढला.

सविस्तर वाचा - ठोसे लगावत तिने गाठले यशोशिखर
डॉ. रोडे यांनी रक्तबंबाळ अवस्थेत पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिस निरीक्षक दिलीप चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली व डॉ. रोडे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉ. संजय रोडे यांच्या हाताला आणि डोक्‍याला दुखापत झाली असून त्यांची प्रकृती धोक्‍याबाहेर असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. या घटनेचा सर्व डॉक्‍टर, औषधी दुकानदार यांच्यासह सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी निषेध केला आहे. पोलिसांनी सर्व दिशेने तपास आरंभला असून तूर्तास अज्ञात हल्लेखोराविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राम कदम करीत आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

Pune Kolhapur Highway Traffic : गणेशोत्सवाच्या गर्दीने खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी; पाच तासांचा प्रवास दहा तासांवर

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! सांगलीतील ४ हजार ९९ लाभार्थ्यांची दुसरी कर्जमाफी यादी प्रसिद्ध

Marathi News Live Updates : जांभूळवाडी दरी पुलावर मध्यरात्री भीषण अपघात; चारचाकीचा चक्काचूर, ट्रक पलटी

SCROLL FOR NEXT