Father and son died in Accident in Chandrapur  
विदर्भ

चिमुकल्याच्या हाताचा उपचार करून परतताना अचानक समोर आला काळ अन् क्षणाधार्त झालं होत्याचं नव्हतं  

मनोज कनकम

घुग्घुस (जि. चंद्रपूर) : भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार असलेल्या बापलेकाचा मृत्यू झाला. तर, अन्य एक गंभीररीत्या जखमा झाला. ही घटना घुग्घुस-साखरवाही रस्त्यावरील भाटिया कोल वॉशरीजजवळ शनिवारी (ता. 6) दुपारच्या सुमारास घडली. उमेश नारायण दानव (वय 35), आयुष उमेश दानव (वय 8) अशी मृतांची, तर सतीश दादाजी दानव असे जखमीचे नाव आहे

हेही वाचा - Video : कामगार राज्यमंत्री बच्चू कडू वीटभट्टी कामगारांच्या दारी; सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन...
.  
भद्रावती तालुक्‍यातील वाघेडा येथील उमेश दानव हे आपला आठ वर्षीय मुलगा सतीशच्या हाताचा उपचार करून नांदा फाटा, बीबी येथून दुचाकी क्रमांक एमएच-34 बीई 8196 ने घुग्घुसमार्गे घरी परतत होते. यावेळी त्यांच्यासोबत सतीश दानव हासुद्धा होता. दरम्यान, भाटिया कोल वॉशरीजवळ तडाळीवरून घुग्घुसकडे येणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक एमएच-34 एएम 8508 ने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. 

या अपघातात आयुषचा जागीच मृत्यू झाला. तर उमेश दानव व सतीश दानव हे गंभीर जखमी झालेत. घटनास्थळी गोळा झालेल्या नागरिकांनी उमेश दानव व सतीश दानव यांना घुग्घुस येथील राजीव रतन रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. मात्र, उपचारादरम्यान उमेश दानव यांचा मृत्यू झाला. तर, सतीश दानव यांच्यावर उपचार सुरू आहेत.

चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. घटनास्थळी ये-जा करणाऱ्या नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती कळताच पोलिस निरीक्षक राहुल गांगुर्डे, उपपोलिस निरीक्षक नीलम डोंगरे, मेजर मोरे, योगेश शार्दूल यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. फरार चारचाकी वाहनचालकाचा पोलिस शोध घेत आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Beed : कर्ज फेड नाहीतर पत्नीला माझ्या घरी सोड, सावकाराच्या जाचाने दुकानदाराची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं, वर्गणी काढून क्रियाकर्म करा

SCROLL FOR NEXT