crime news crime news
विदर्भ

दोन मुलांचे भांडण सोडविणे जीवावर बेतले, पित्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : दोन भावांचे भांडण सोडविणे पित्याच्या जीवावर बेतल्याची घटना भातकुली (Bhatkuli amravati) तालुक्यातील आबीदपूर येथे घडली. मोठ्या मुलाने नाकावर मारल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. महादेव तायडे (वय ७०) असे मृत पित्याचे नाव असून पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.

महादेव यांचा मुलगा ज्ञानेश्वर तायडे रात्री मद्यप्राशन करून आला. त्यानंतर लहान भाऊ दीपक तायडे याच्यासोबत भांडण झाले. मद्यप्राशन करून आलेल्या ज्ञानेश्वरला त्याने घराबाहेर जाण्यास सांगितले. यावरून त्यांच्यातील वाद विकोपास गेला. दोघांमध्ये जोरदार हाणामारी सुरू होती. दरम्यान वडील महादेव तायडे यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता ज्ञानेश्वरने त्यांच्या नाकावर जोरदार ठोसा मारल्याने ते जखमी होऊन खाली पडले. त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. मात्र, अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

वलगाव पोलिसांनी याप्रकरणी लहान मुलगा दीपक तायडे याच्या फिर्यादीवरून खुनाच्या आरोपाखाली गुन्हे दाखल केला. तसेच ज्ञानेश्वर तायडे यास अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT