Father killed daughter in wardha Father killed daughter in wardha
विदर्भ

मुलीने धरला प्रियकराशी लग्न करण्याचा हट्ट; बापाने केला खून

सकाळ डिजिटल टीम

वर्धा : मुलीने प्रियकराशी लग्न करण्याचा हट्ट धरल्याने राग अनावर झालेल्या बापाने लाकडी काठीने मारून खून केला. ही घटना सेलू तालुक्यातील हमदापूर येथे बुधवारी घडली. याप्रकरणी आरोपी बापाला पोलिसांनी अटक केली. प्रणाली विलास ठाकरे (१८) असे मृत मुलीचे नाव आहे. (Father killed daughter in wardha)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणाली ही ऑक्टोबर २०२१ मध्ये मामाकडे पाहुणी म्हणून आली होती. दरम्यान, तिचे येथील एका युवकाशी सूत जुळले. दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. लग्न करण्याचेही ठरवले. मात्र, याला कुटुंबीयांकडून विरोध होणार असल्याचे लक्षात आल्याने दोघांनी पळ काढला होता. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिल्याने मुलाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली होती.

मुलीला तिच्या कुटुंबीयाच्या स्वाधीन करण्यात आले होते. तेव्हापासून प्रणालीचे कुटुंबीयांशी पटत नव्हते. त्यांच्यात घरी नेहमी खटके उडायचे. दरम्यान, आज बुधवारी (ता. ११) दुपारी याच कारणातून वडील आणि मुलीमध्ये वाद झाला. मुलीने प्रियकराशी लग्न करण्याचा हट्ट धरल्याने चिडलेल्या बापाने लाकडी काठीने मुलीच्या डोक्यावर वार करत गंभीर जखमी केले. यात तिचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच दहेगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा येथे पाठविला. घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप यांनी भेट देत घटनेचा आढावा घेतला. याप्रकरणी आरोपी विलास ठाकरे याला पोलिसांनी अटक केली आहे. तपास दहेगाव पोलिस ठाणेदार योगेश कामाले करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat प्रकरणात मोठा स्फोट! 58 नाही तर, 100+ व्हिडिओ असल्याची माहिती उघड, ‘तांत्रिक’ शोषणाचा काळाकुट्ट खेळ समोर

IPL 2026 Marathi News: बाळासोबत वेळ घालवायचाय... ७ सामने नाही खेळू शकणार स्टार गोलंदाज... नियमानुसार होणार बंदीची कारवाई?

Ashok Kharat Case : "सावित्रीची लेक जिथे भोंदू पावलांवर वाकली...." अमोल कोल्हेंची रुपाली चाकणकर यांच्यावर बोचरी टीका

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर येथे महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत; प्रशासनाचे दुर्लक्ष!

Pune News: पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील विकास ‘व्हेंटिलेटर’वर; जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतील आदिवासी बांधव सोयीसुविधांपासून वंंचित!

SCROLL FOR NEXT