dhaba. 
विदर्भ

Video : कुटुंबापेक्षा गावाचे हित जपणाऱ्या या बापानेच पत्नी आणि मुलीला ठेवले संस्थात्मक विलगीकरणात

निलेश झाडे

धाबा (जि.चंद्रपूर) : कुटुंबापेक्षा समाजाचे, गावाचे हित अधिक महत्त्वाचे असते, हे एका बापाने आपल्या कृतीतून दाखवून दिले. गुजरातमध्ये असलेल्या मुलीला गावी आणण्यासाठी ठाणेदारांना भेटून विनंती करणाऱ्या बापाने मुलगी गावी परत आल्यानंतर गावाचे हित लक्षात घेऊन मुलीला आणि तिला आणायला गेलेल्या पत्नीला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय स्वत:हून घेतला आणि समाजाप्रती आपले कर्तव्य योग्यरित्या बजावले.

बाहेरून कणखर दिसणारा बाप..हृदयातून हळवा असतो. आदीवासी गावातील अशाच एका कणखर बापाच्या खंबीरपणाने माय-लेक दुखावली गेली. ग्रामपंचायत गृह विलगीकरण करणार होती मात्र गावाच्या सुरक्षेसाठी बापाने संस्थात्मक विलगीकरणाचा निर्णय घेतला. शाळेच्या इमारतीत माय-लेकी दोघीच विलगीकरणात आहेत. त्यांच्या काळजीने चिंताक्रांत झालेला हा बाप माय-लेकीच्या सुरक्षेसाठी रात्र जागून काढीत आहे. बापाच्या निर्णयाने दुखावलेली लेक बापाचा हळवेपणा बघून गहिवरली आहे.
सुरेश शंकर पेंदोर असे त्या बापाचे नाव आहे. गोंडपिपरी तालुक्‍यातील चिवंडा या आदीवासीबहूल गावात ते वास्तव्यास आहेत.

गोंडपिपरी तालुक्‍यातील चिवंडा हे लहानसे गाव जंगलालगत वसले आहे. गावात आदिवासी बांधवांची संख्या मोठी आहे. गावातील रोशनी सुरेश पेंदोर ही तरुणी गुजरात राज्यातील बडोदरा येथील एका कंपनीत कामावर होती. टाळेबंदीत शिथिलता आल्यावर तिने गाव गाठायचे ठरविले. ती गुजरातहून वर्धेला आली. वर्धेला तिला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले. तिने वडीलांना याची माहीती दिली. वडील सुरेश शंकर पेंदोर अस्वस्थ झाले. त्यांनी धाबा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुशील धोकटे यांची भेट घेतली. मुलीला गावी आणण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. ठाणेदारांनी वाहन पुरविले. पोडसा गावातील उपसरपंच देविदास सातपुते यांनीही मदतीचा हात पुढे केला. आई वेणाबाई या वर्धेला गेल्या. मुलीला घेऊन परतल्या.

मुलगी रेडझोनमधून आली होती. त्यामुळे ग्रामपंचायतने माय-लेकीला गृह विलगीकरणात ठेवण्याचे ठरविले. मात्र गृह विलगीकरणाला वडीलांनी नकार दिला. मुलगी रेडझोनमधून आली आहे. चुकून ती कोरोनाबाधित निघाली तर गावावर संकट ओढवेल. त्यामुळे या दोघींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याची विनंती केली. गावातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत या दोघींना ठेवण्यात आले आहे. वडीलांच्या भुमिकेने माय-लेक नाराज होत्या. मात्र गावाच्या सुरक्षेसाठी कणखर भुमिका घेतलेल्या या बापाचा हळवेपणा बघून मुलगी गहिवरली. शाळेच्या इमारतीत दोघीच माय-लेकी आहेत. त्या घाबरू नये म्हणून वडील रोज रात्री शाळा परिसरातच झोपतात. माय-लेकीला धीर देतात. बारा दिवसांपासून माय-लेकी विलगीकरणात आहेत. दोन दिवसांनी त्या घरी जाणार आहेत. या दरम्यान बापाच्या स्वभावाचे अनेक कंगोरे मुलीने बघितले. " बाप हो तो ऐसा " असे ती आता अभिमानाने म्हणत आहे.

गावाची सुरक्षा महत्त्वाची
कोरोना महामारीचे संकट मोठे आहे. माझी मुलगी गुजरात मधून आली. ग्रामपंचायतेने तिला गृह विलगीकरणात ठेवण्याचे ठरविले होते. मात्र गावाच्या सुरक्षेसाठी मी मुलीला आणायला गेलेल्या पत्नीला आणि मुलीला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याचे ठरविले. पत्नी,मुलगी घाबरू नये यासाठी मी रोज रात्री विलगीकरण इमारत परिसरात थांबत असतो.

सविस्तर वाचा - अल्पवयीन मुलीचे अपहरण करून चौघांनी पाजली दारू, पुढे काय झालं वाचा...

 

वाहन उपलब्ध करून दिले
गुजरात मधून आलेल्या त्या मुलीच्या वडीलांनी माझी भेट घेतली. मुलीला गावी आणण्यासाठी कायदेशीर माहिती देण्याची विनंती केली होती. मुलीला आणण्यासाठी आर्थिक चणचण असल्याचे जेव्हा माझ्या लक्षात आले तेव्हा त्यांना वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिली. ती तेरा दिवसापासून गावातील एका इमारतीत संस्थात्मक विलगीकरणात आहे.
- सुशिल धोकटे,
ठाणेदार,पोलिस स्टेशन धाबा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT