The father was killed and the mother was seriously injured in the accident Bhandara accident news 
विदर्भ

मुलीची लग्नपत्रिका वाटपास जाताना काळाचा घाला; अपघातात वडील ठार तर आई गंभीर जखमी

सकाळ डिजिटल टीम

लाखनी (जि. भंडारा) : मुलीच्या विवाहाची लग्नपत्रिका वाटपास जाताना दुचाकीला सुसाट आलेल्या ट्रेलरने धडक दिली. यात पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना केसलवाडा (वाघ) फाटा येथे शनिवारी सकाळी घडली. मृताचे नाव दिलीराम कवडू वाघाये (वय ५२) असे आहे.  तर संगीता दिलीराम वाघाये (४५) असे जखमीचे नाव आहे. गंभीर जखमी झालेल्या संगीता यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

केसलवाडा येथे वाघाये दांपत्य दुचाकीने (क्र. एमएच ३६/सी ९०१०) लाखनीकडे मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटपासाठी जात होते. केसलवाडा फाटा येथे महामार्ग ओलांडताना भंडाराकडे भरधाव जाणारा ट्रेलरने (क्र. आरजे ०४/जेए ८३२२) दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दिलीराम वाघाये यांचा डोक्‍यावरून ट्रेलरचे चाक गेल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. तसेच दुचाकीवर मागे बसलेल्या संगीता वाघाये यांच्या हात व पायाचे हाड मोडल्याने गंभीर जखमी झाल्या.

अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळावर गर्दी केली. त्यांचा जेएमसी कंपनी विरोधात रोष वाढल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. लाखनी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनोज वाडिवे व सहकारी संजय कोरचे, अमोल तांबे, भगवान थेर, दिगंबर तलमले, जतिन दासानी, अनिल राठोड यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला. यावेळी जमावाने मृताच्या कुटुंबाला जेएमसी कंपनीकडून आर्थिक मदतीची मागणी केली होती. अपघातग्रस्त ट्रेलर पोलिसांनी जप्त केला आहे.

तासाभरातच बुजविले खड्डे

केसलवाडा फाटापासून लाखनी स्मशानभूमीपर्यंत राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाचे बांधकाम जेएमसी कंपनी करत असल्याने वाहतूक सर्व्हिस रोडने सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. दुरुस्तीबाबत अनेकांनी मागणी केली. पण काही उपयोग झाला नाही. आज अपघातात जीवित हानी होताच तासाभरातच कंपनीने सर्व्हिस रोडवरील खड्डे बुजविले. यामुळे कंपनीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

२१ एप्रिल रोजी होते मुलीचे लग्न

दिलीराम यांची मुलगी स्नेहा हिचे लग्न २१ एप्रिल रोजी होणार आहे. यासाठी पत्रिका वाटण्याचे काम सुरू होते. शनिवारी सकाळी दिलीराम हे पत्नी संगीता यांच्यासह केसलवाडावरून दुचाकीने निघाले. केसलवाडा (राघोर्ते), किटाळी, पालांदूर, पेंढरी या गावात नातेवाइकांना लग्नपत्रिका देण्याचे ठरविण्यात आले होते. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर केसलवाडा फाट्यावर लाखनीकडे वळत असताना भरधाव येणार्‍या ट्रेलरने दुचाकीला जबर धडक दिली. त्यात दिलीराम जागीच ठार झाले. तर त्यांची पत्नी संगीता गंभीर जखमी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT