file photo 
विदर्भ

भय इथले संपत नाही... 

संतोष रोकडे

अर्जुनी मोरगाव (गोंदिया ) : आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त अशी शासन दरबारी नोंद असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्‍यात महिन्याभरापासून चोरट्यांनी दहशत माजविली आहे. दररोज कुठे ना कुठे चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसदेखील अजूनही चोरट्यांच्या मुसक्‍या आवळण्यात अपयशी ठरले आहेत. तालुक्‍यात नवेगावबांध, केशोरी व अर्जुनी मोरगाव अशी एकूण तीन पोलिस ठाणी आहेत. सद्यःस्थितीत तालुक्‍यातील सर्वत्रच चोऱ्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे. 

प्राथमिक शाळेत चोरी

काही दिवसांपूर्वी तालुक्‍यातील येगावपाठोपाठ बाराभाटी येथील ग्रामपंचायत कार्यालय फोडून चोरट्यांनी संगणक व साहित्य चोरून नेले. हा तपास सुरू असतानाच काही दिवसांनी इटखेडा, जाणवा, कोरंभी या तीनही ठिकाणच्या ग्रामपंचायतींच्या कार्यालयाचे कुलूप तोडून संगणकीय साहित्य तसेच कोरंबी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतसुद्धा चोरी करून संगणक साहित्य लांबविले. या घटनेनंतर 

ग्रामपंचायत कार्यालय फोडून दस्तऐवजांची नासधूस

लगेच चार दिवसांनी वडेगाव बंध्या या ठिकाणचे ग्रामपंचायत कार्यालय फोडून दस्तऐवजांची नासधूस केली. एकंदरीत तालुक्‍यात सर्वत्र चोरांचा हाहाकार माजलेला आहे. चोरांनी ग्रामपंचायत कार्यालयांकडे मोर्चा वळवून संगणक साहित्य चोरून नेण्याचा सपाटा लावल्याचे दिसते. यातही भर म्हणजे महागाव येथील शंकर गहाणे यांच्या घरी रात्रीच्या वेळी दोन लाखांची चोरी झाली. लागोपाठ होणाऱ्या चोऱ्यांमुळे गावखेड्यातील नागरिक भयभीत झाले आहेत. पोलिस विभागाने या चोरांचा छडा लावण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजसुद्धा तपासले; मात्र विशेष असे काहीही पोलिसांच्या हाती लागले नाही. दरम्यान, भयमुक्त जीवन जगण्यासाठी पोलिस प्रशासनाने या चोरांचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी तालुकावासींनी केली आहे. 


सर्वत्र होत असलेल्या चोरीच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी आमचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. जिल्ह्यातील पोलिस विभागाकडून माहिती घेणे सुरू आहे. लवकरच चोरट्यांना गजाआड करू. 
-महादेव तोंडले, ठाणेदार, अर्जुनी मोरगाव. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली, गणपतीच्या ट्रॉलीला धडक देत 4 जणांना उडवलं; घटनास्थळाचा VIDEO

सौंदर्य अन् बुद्धिमत्तेचा संगम! वयाच्या २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करून बनली IFS अधिकारी, कोण आहे तमाली साहा?

Asian Games 2026 : अडखळला, पडला... पण जिद्दीने शर्यत पूर्ण करून भारताचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला! कोण आहे सावन बरवाल?

Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत सतेज पाटलांनी डीजेच्या तालावर धरला ठेका; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT