adhik mahina 
विदर्भ

आला जावयाच्या कौतुकाचा महिना! बाजारात गर्दी, मिष्ठान्न आणि भेटवस्तुंची रेलचेल

दीपक खेकारे

गडचांदूर (चंद्रपूर) - मराठी महिन्यानुसार तीन वर्ष ३१ महिने व १६ दिवसांनी अधिक मास येतो. या वर्षीही शुक्रवारपासून अधिक महिना सुरू झाला असून त्या पार्श्वभूमीवर घरोघरी, बाजारपेठेत लगबग पाहायला मिळते आहे. अधिक मासास प्रारंभ झाल्यामुळे जावई खूष आहेत तर जावयाचा पाहुणचार करण्यासाडी सासुरवाडीची मंडळी आर्थिक गणित जुळवित आहेत. परंतु कोरोनाच्या सावटाने अनेक जावयांना सासुरवाडीला जाणे शक्य नसल्याचे कळते.

दर तीन वर्षांनी अधिक मास (धोंड्याचा महिना) येतो. या महिन्यात लेकीस आणि जावयास घरी बोलवून त्यांच्यासाठी मिष्ठान्न बनविले जाते. भोजनानंतर जावयास नवीन कपडे संसार उपयोगी साहित्य व सोन्याची अंगठी घालून जावयाचे बोट पिवळे करण्याची जुनी प्रथा आहे. ही प्रथा आजही शहराबरोबर ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाने जपली जाते .

अधिक मासाची चाहुल लागली की , जावई बापूंच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतो तर जावयाया पाहुणयार करण्यासाठी सासरच्या मंडळीची तयारी सुरु होते.
यंदा मात्र कोरोनाच्या सावटामुळे अनेक जावयांना सासुरवाडीला जाणे शक्य नाही

यंदा १८ सप्टेंबर पासून अधिक मासाला प्रारंभ झाला असून ग्रामीण भागात जावई बापुंना आमंत्रण देण्यास सुरुवात झाली आहे . विशेष म्हणजे यंदाच विवाह झालेल्या जावयावर सासरच्या मंडळींची विशेष मर्जी असल्याचे दिसून येत आहे.

दुष्काळात तेरावा महिना
संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असून गेल्या ८ महिन्यांपासून देशात आर्थिक संकट कोसळले आहे अशा परिस्थितीत अधिक मास आला आहे. परंतु जुनी प्रथा मोडता येत नाही व लेकी जावयाला दुःखी करता येत नाही त्यामुळे यंदा आलेल्या अधिकमासात जावयाला घरी बोलावून मान सन्मान करावा लागणार आहे. यंदाचा अधिक महिना हा दुष्काळात तेरावा महिना ठरत असल्याचे काही जेष्ठ शेतकऱ्यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

अधिकमास म्हणजे काय
ऋतू सौरमासाप्रमाणे ठरलेले असतात . चांद्रवर्षाचे ३५४ , तर सौरवर्षाचे ३६५ दिवस असतात. म्हणजे या दोन वर्षामध्ये ११ दिवसाचे अंतर असते. हे अंतर भरून यावे तसेच चांद्रवर्ष व सौरवर्ष याचा मेळ बसावा म्हणून एक महिना अधिक धरावा असे म्हटले जाते . या महिन्यात हिंदुधर्म पद्धतीनुसार मुली-जावईबापुना लक्षी नारायणाचा जोडा समजून त्यांचे पुजन केले जाते.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Paithan Highway Accident: पैठण–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघात; सूरज एरंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, रुग्णवाहिकेसाठी अर्धा तास प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT