few student came to school on first day in amravati 
विदर्भ

अमरावतीत मनपाच्या शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती, तर खासगी अन् ग्रामीण भागात फिरविली पाठ

सुधीर भारती

अमरावती : कोरोनाची भीती, शाळेचा पहिला दिवस कसा राहील? याचा आलेला तणाव तसेच नियोजनाबाबतची उत्सुकता आज पालक व विद्यार्थ्यांनी अनुभवली. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आठ महिन्यापूर्वी बंद झालेल्या शाळा सोमवारपासून पुन्हा सुरू करण्यात आल्या. मात्र, पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी शाळेच्या पहिल्या दिवशीच पाठ फिरविली. शहरातील खासगी तसेच जिल्ह्यातील जवळपास सर्वच शाळांमधील पटसंख्येच्या अत्यल्प उपस्थिती नोंदविण्यात आली. पण, मनपाच्या शाळांमध्ये मात्र विद्यार्थ्यांची चांगली उपस्थिती दिसून आली.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आठ महिन्यांपूर्वी लॉकडाउनच्या काळात शाळा सुद्धा लॉकडाउन करण्यात आल्या. त्यानंतर ऑनलाइन वर्ग सुरू झालेत. राज्य शासनाने 23 नोव्हेंबरपासून 9 ते 12 वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन केले. त्याबाबत शिक्षण विभागाने तयारी सुद्धा केली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीच्या सर्व उपाययोजना शाळांकडून करण्यात आल्यात. मात्र, पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविलेच नाही. ग्रामीण भागातील 717 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  शाळा वेळेवर उघडल्यात. मात्र, काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी शाळेत पाय सुद्धा टाकला नाही. ग्रामीण भागात अतिशय कमी विद्यार्थी संख्या दिसून आली. मात्र, मनपाच्या शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहायला मिळाली.

'त्या' शिक्षकांना रुजू करू नये -
ज्या शिक्षकांनी आरटीपीसीआर चाचणी केली आहे. मात्र, त्यांचे अहवाल अद्यापही अप्राप्त आहेत. अशा शिक्षकांना मुख्याध्यापकांनी त्यांचे अहवाल प्राप्त झाल्याशिवाय रुजू करून घेऊ नये, अशा सूचना जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी दिले. याबाबत सर्व प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना पत्र सुद्धा देण्यात आले.

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्हापरिषदेच्या गर्ल्स हायस्कूल येथे भेट देत शाळेतील सुरक्षात्मक उपायांची पाहणी केली. गर्ल्स हायस्कूलमध्ये 9 वी तसेच 10 वीचे एकूण 295 विद्यार्थी असून नववीचे 3 तर 10 वीचे 3 वर्ग करण्यात आले आहे. पहिल्या दिवाशी केवळ 35 विद्यार्थीच हजर राहिले. माध्यमिक शिक्षणाधिकारी वामन बोलके यांनी सुद्धा काही शाळांना भेटी दिल्या.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT