fifth man died in tiger attack on Kolar area 
विदर्भ

चंद्रपुरातील वाघ उठला जीवावर; एका महिन्यात केली इतक्‍या गावकऱ्यांची शिकार...

जितेंद्र सहारे

चिमूर (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या कोलारा परिसरात वाघाचा धुमाकूळ सुरूच आहे. मार्च महिन्यापासून चार जूनपर्यंत दोन महिला व दोन पुरुषांना वाघाने ठार केले. रविवारी पुन्हा याच परिसरात पाचवा बळी गेतल्याची घटना सकाळी आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. हा पाचवा बळी कोलारा येथील असून, राजेश्‍वर लक्ष्मण दडमल (वय 50) असे त्याचे नाव आहे. 

जग प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, त्यातुलनेत त्यांना वनक्षेत्र कमी पडत आहेत. ज्यामुळे वन्यप्राणी व माणवी संघर्ष वाढलेला दिसून येत आहे. कोलारा परिसरात तीन महिन्यांपासून आजतागायत पाच नागरिकांना वाघाने ठार केले आहे. मार्च महिन्यात जागली करण्यासाठी गेलेल्या कोलारा येथील बालाजी वाघमारे, एप्रिल महिन्यात मोहफूल वेचणाऱ्या सातारा येथील यमूना पांडूरंग गायकवाड, मे महिन्यात तेंदूपत्ता तोडायला गेलेल्या कोलारा येथील लिलाबाई चंद्रभान जिवतोडे, चार जूनला स्वतःच्या शेतात कुंपण करण्यासाठी गेलेल्या बामनगाव येथील राज्यपाल दयाराम नागोसे यांना वाघाने ठार केले होते.

कोलारा येथील राजेश्‍वर लक्ष्मण दडमल हे जंगलालगत असलेल्या सर्वे क्रंमाक 91 असलेल्या शेतीमध्ये नेहमीप्रमाणे तीन दिवसांपूर्वी गेले होते. मात्र, परत काही आलेच नाही. त्यामुळे त्यांचा सगळीकडे शोध सुरू होता. रविवारी सकाळी वन विकास महामंडळाच्या क्षेत्रात शोध घेत असताना वाघ बसून होता. याच परिसरात काहीतरी वाघाची शिकार असावी म्हणून पाहले असता तुटलेला हात दिसला. काही अंतरावर दुसरा हात तर थोड्या दूर कुजलेला राजेश्‍वर यांचा मृतदेह दिसला. याची माहिती वन विभागाला देण्यात आली. यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी शेंडे पथकासह घटनास्थही हजर झाले. त्यांनी पुढील कार्यवाही सुरू केली आहे. 

वाघाचा बंदोबस्त करा

एकाच परिसरात वाघाने तिघांचा बळी घेतल्याने सर्वत्र दहशत पसरली आहे. वनविभागाविरुद्ध रोष व्यक्त करण्यात येत आहे. या वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा, जेणेकरून शेतीचे कामे करता येतील, अशी मागणी नागरिकांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके यांनी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

Pali News : मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यात चक्क मगरींचा मुक्काम! कामगारांची समयसूचकता अन मगरींना मिळालं नवजीवन

SCROLL FOR NEXT