fifth to twelve school closed due to corona cases increases in wardha  
विदर्भ

Breaking : कोरोनामुळे पाचवी ते बारावीच्या शाळा बंद, प्रशासनाचे आदेश

सकाळ डिजिटल टीम

वर्धा : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे पाचवी ते बारावीच्या शाळा पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच गुरुवारीच वर्ध्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. तसेच एका ठिकाणी ५ पेक्षा अधिक व्यक्त आढळल्यास कारवाई करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

नियमाचा भंग झाल्यास सभागृह सील करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. शहरात फिरताना व गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्तीचे करण्यात आले आहे. याचा भंग करणाऱ्यांवर पाचशे रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. विनाकारण शहरात फिरणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आलेली असून पाचच्या वर गर्दी केल्यास कारवाई होणार आहे. रात्री सातच्या आत दुकाने बंद करावे, असे निर्देश प्रशासनाने यावेळी दिले. अत्यावश्‍यक सेवेसाठी ही वेळ रात्री 9.30 पर्यंत ठेवण्यात आलेली आहे. उपविभागीय अधिकारी, पोलिस प्रशासन, महसूल विभाग, पंचायत समिती आणि नगरपालिका हे शहरात आणि तालुक्‍यात या काळात नियंत्रण ठेवणार आहे. पुन्हा संचारबंदी करण्याची वेळ पडू नये, म्हणून नागरिकांनी दक्ष राहण्याचे व नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! सोमवारी मध्यरात्रीपासून भाववाढीचा निर्णय, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

Kalamboli Accident: नवी मुंबईत भरधाव कारचा थरार! डॉक्टरनं पदपथावरील पादचाऱ्यांना चिरडलं; लहान मुलांसह ४ जण गंभीर जखमी

Rahul Gandhi Defamation Case: पुण्यात राहुल गांधी मानहानी खटल्याला कडक कायदेशीर वळण! विशेष कोर्टातील उलटतपासात सात्यकी सावरकरांनी मान्य केला '१० दया याचिकां'चा ऐतिहासिक ताळेबंद

Kannad Accident : मद्यधुंद क्रूझर चालकाने बुलेटला चिरडले; अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

Pune Developer Death: बांधकाम व्यावसायिक कपिल गांधी यांचे हृदयविकाराने निधन

SCROLL FOR NEXT