Filed a case against Shrikant Deshpande 
विदर्भ

शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रा. श्रीकांत देशपांडे यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा

संतोष ताकपिरे

अमरावती : प्रचारसभेची परवानगी नसतानाही सभा घेतल्याप्रकरणी अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रा. श्रीकांत देशपांडे यांच्याविरुद्ध शुक्रवारी (ता. २०) आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी राजापेठ ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, उपविभागीय न्यायदंडाधिकारी रणजीत बबन भोसले यांनी याप्रकरणी सायंकाळी तक्रार नोंदविल्यावर प्रा. देशपांडे यांच्यासह इतर काही लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला, असे पोलिस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या परिसरात प्रा. देशपांडे यांच्या समर्थनार्थ राज्याच्या उच्चशिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रचारसभा घेण्यात आली होती. परंतु, सभेच्या आयोजनापूर्वी आचारसंहिता लागू असताना प्रशासनाच्या परवानगीशिवाय सभा घेता येत नाहीत. परंतु, परवानगी नसताना ही सभा घेण्यात आली.

सभेत १०० ते ११० जण उपस्थित होते. त्यामुळे उपविभागीय न्यायदंडाधिकारी रणजीत भोसले यांनी याप्रकरणी सायंकाळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष तसेच या निवडणुकीतील उमेदवार संगीता शिंदे यांनी आज या सभेबाबतची तक्रार प्रशासनाकडे केली होती.

प्रशासनाकडून अन्य उमेदवारांना प्रचार सभेसाठी परवानगी नाकारली जात असतानाच श्रीकांत देशपांडे यांना मात्र सूट दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आचारसंहिता भंग करणाऱ्या उमेदवारांवर कारवाई केल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी आग्रही भूमिका संगीता शिंदे यांनी घेतली होती.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रामनवमीची मिरवणूक अन् खुनशी राग! पुण्यात भरदिवसा तरुणाला संपवण्याचा प्रयत्न; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर

PSL Controversy: PSLमध्ये मोठा ड्रामा! फखर जमानकडून 'बॉल टॅम्परिंग'? पीसीबीने हायलाईट्समधून पुरावेच हटवले

गायत्रीच्या केळवणाची बातचं न्यारी! फिश फ्राय, मोदक, पुरणपोळी आणि बरंच काही, Video शेअर करत म्हणाली...

Latest Marathi News Live Update : ज्योतिबा भाविकांना मारहाण प्रकरणी परिते गाव आणि व्यापार पेठ बंद

Ashok Kharat Case : नीलम गोऱ्हे देखील अशोक खरातकडे भविष्य पाहायला जायच्या; तृप्ती देसाईंच्या आरोपाने खळबळ

SCROLL FOR NEXT