bjp bjp
विदर्भ

मनपा उपायुक्तांना जीवे मारण्याची धमकी, भाजपच्या नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : चंद्रपूर महानगर पालिकेच्या (chandrapur municipal corporation) आमसभेत काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये राडा झाल्यानंतर महापौर राखी कंचर्लावार (mayor rakhi kancharlawar) यांचे पती नगरसेवक संजय कंचर्लावार यांनी उपायुक्त विशाल वाघ यांच्या कक्षात जाऊन अश्लील शिवीगाळ केली. त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. वाघ यांनी पोलिसात तक्रार केली असून संजय कंचर्लावार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. (fir filed against corporator in threaten to deputy commissioner of chandrapur case)

मनपाच्या आमसभेत आज गुरुवारी प्रचंड राडा झाला. काँग्रेस आणि भाजपने एकमेकांविरोधात पोलिसात तक्रार केली. आमसभा आटोपल्यानंतर महापौर राखी कंचर्लावार यांनी उपायुक्त विशाल वाघ आणि अतिरिक्त विपीन पालीवाल यांना आपल्या कक्षात बोलविले. त्यावेळी महापौरांच्या कक्षात स्थायी समिती सदस्य रवी आसवानी, भाजपचे नगरसेवक देवानंद वाढई, चंद्रकला सोयाम, कल्पना बगुलकर आणि महापौरांचे पती नगरसेवक संजय कंचर्लावार उपस्थित होते.

यावेळी महापौरांनी आमसभेतील राड्याच्या अनुषंगाने वाघ आणि पालीवाल यांना काही सूचना केल्या. त्यानंतर कोणतेही कारण आणि अधिकार नसताना संजय कंचर्लावार यांनी मध्येच हस्तक्षेप केला. वाघ यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तुम्ही बाहेरगावचे आहात. सांभाळून रहा. चारचौघांना पाठवून कोणत्या वार्डात मारून फेकणार, कुणाला माहीत होणार नाही, अशी धमकी संजय कंचर्लावार यांनी दिली. शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यानंतर वाघ यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संजय कंचर्लावार यांचयावर गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: सौदी अरेबियाने पाइपलाइन बंद केली, कच्च्या तेलात तेजी; गणेश चतुर्थीला पेट्रोल-डिझेल अन् LPG चे दर किती?

Maratha Reservation: मुंबई पोलिसांची परवानगी नाकारली तरी जरांगे जाणारच; ‘आंदोलनस्थळी मरेन, पण सरकारपुढे गुडघे टेकणार नाही’

IND vs AFG: पहिल्या T20I पूर्वी 'जन गण मन'च्या आधी 'वंदे मातरम्' का वाजवलं गेलं? जाणून घ्या ऐतिहासिक घटनेमागचं कारण

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती आगमन मिरवणुकीला सुरुवात

Maharashtra School Recruitment: शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! राज्यात २८ हजारांहून अधिक पदे भरण्याचा मार्ग मोकळा, शिक्षकेतर भरतीचे नवे नियम जाहीर

SCROLL FOR NEXT