fir filed against youth for physical abused in amravati 
विदर्भ

साखरपुडा होताच तरुणावर अत्याचाराचा गुन्हा दाखल

संतोष ताकपिरे

अमरावती : लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीवर अत्याचारही केला. परंतु, साखरपुडा दुसऱ्याच तरुणीसोबत गुपचूप उरकला. त्यामुळे दुसरीसोबत बोहल्यावर चढण्याचे स्वप्न बघणाऱ्या तरुणाविरुद्ध लग्नापूर्वीच अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रवेश ऊर्फ बिट्टू साहू, असे अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव असल्याचे नांदगावपेठ पोलिसांनी सांगितले. पीडित तरुणी जेथे नोकरी करायची त्याचठिकाणी संशयित आरोपी प्रवेश ऊर्फ बिट्टू याच्यासोबत तिची ओळख झाली. प्रेमप्रकरणानंतर प्रवेशने तरुणीला लग्नाचे आमिषसुद्धा दाखविले. त्यानंतर तिच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तीन वर्षांनंतर प्रवेशचे लग्न दुसऱ्या तरुणीसोबत जुळले. ही बाब माहिती होताच, पीडितेने त्याची भेट घेतली.

प्रेयसीने दुसऱ्या मुलीसोबत लग्न करू नकोस, झालेला साखरपुडा तोडण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पीडित तरुणीच्या घरी जाऊन प्रवेशसह त्याच्या काही निकटवर्तीयांनी वाद घातला. शिवीगाळ करून अपमानित केले. अत्याचाराची तक्रार दिल्यास प्रवेश व त्याच्या निकटवर्तीयांनी जिवाने मारण्याची धमकी दिली, असा आरोप पीडितेने नांदगावपेठ ठाण्यात दाखल तक्रारीत केला. याप्रकरणी पोलिसांनी प्रवेश ऊर्फ बिट्टू साहू विरुद्ध अत्याचाराचा, तर इतरांविरुद्ध जीवे मारण्याची धमकी आणि अ‌ॅट्रॉसिटी ऍक्‍ट अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक झाली नाही, असे नांदगावपेठ पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Giorgia Meloni wishes PM Modi: मोदींना इटलीच्या पंतप्रधान मेलोनींकडून 'सेल्फी'वाल्या मेसेजद्वारे खास शुभेच्छा, म्हणाल्या...

Jalgaon News : जळगाव विमानसेवा ठप्प: अहमदाबाद विमान दीड महिन्यापासून बंद, प्रवाशांची गैरसोय!

Latest Marathi News Updates : हिमाचल आपत्तीवर भाजप खासदार कंगना राणौत यांचे विधान

Facial Surgery Success Story: "सुसाईड डिसीज"वर यशस्वी शस्त्रक्रिया - ठाण्यात दोन रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

Manoj Jarange Patil: चलो दिल्ली! मराठे दिल्लीत धडकणार, देशभरातील मराठ्यांना मनोज जरांगे करणार एकत्र

SCROLL FOR NEXT