fire at Electro Homeopathy shop in Yavatmal  
विदर्भ

इलेक्ट्रो होमिओपॅथी दुकानाला भीषण आग; तब्बल १० लाखांचं नुकसान; यवतमाळमधील घटना 

सूरज पाटील

यवतमाळ : आयुषी इलेक्ट्रो होमिओपॅथी दुकानाला आग लागल्याने जवळपास दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना सोमवारी (ता.22) दुपारी दोन वाजता दरम्यान दत्त चौकातील (संत सेना चौक) नगरपालिकेच्या गाळ्यात घडली.

भाजी मंडीतील पालिका गाळ्यात आयुषी इलेक्ट्रो होमिओपॅथी नाचाचे दुकान आहे. दुकान बंद असताना दुपारच्या सुमारास आतमधून धूर येताना दिसला. आगीची घटना लक्षात येताच गजबजलेल्या दत्त चौकात एकच खळबळ उडाली.

 या घटनेची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. आग दुसर्‍या माळ्यावर धुमसत असल्याने विझविताना अग्निशमन दलाच्या पथकाला चांगलीच कसरत करावी लागली. आगीत पाच लाखांचे फर्निचर, होमिओपॅथी जिमचे साहित्य, काही मशिनरी, पाच लाखांची औषधी जळून खाक झाली. 

आयुषी होमिओपॅथीच्या संचालक ममता बैस यांचे सेंटर असून, प्रदीप मेंडे यांच्या नावे दुकान आहे. घटनास्थळी तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्यासह नगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी भेट देऊन आढावा घेतला.

व्यावसायिकांची झाली पळापळ

आग धुमसत असल्याचे दिसताच इतरत्र आग पसरण्याच्या भीतीने व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद केली. तर, भाजी विक्रेत्यांची दुकाने हटविण्यात आली. आग बघण्यासाठी झालेल्या गर्दीवर अवधूतवाडी पोलिसांनी नियमंत्रण मिळविले.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT