Fire at Rasbihari jining in gondpipri chandrapur 
विदर्भ

चंद्रपूरातील गोंडपिपरीच्या रासबिहारी जिनींगला भिषण आग; कोट्यवधी रुपयांचा कापूस जळून खाक

संदीप रायपुरे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : धानापूर परिसरात असणाÚया रासबिहारी जिनींगला आज दुपारी भिषण आग लागली.यात करोडो रूपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात आहे.

आग विझविण्यासाठी चंद्रपूर, बल्लारपूर, राजूरा, पोंभुर्णा, अहेरी येथील सहा अग्नीशामक दलाच्या गाडयांना पाचारण करण्यात आले.तोपर्यत आगीने रूद्र रूप धारण केले. घटनेची माहिती कळताच तहसिलदार के.डी.मेश्राम यांनी घटनास्थळी भेट दिली व नुकसानीचा आढावा घेतला. 

आगीच्या घटनाची माहिती कळताच अनेकांनी धावाधाव केली.यादरम्यान झालेल्या अपघातात एका मजुराचा पायाला गंभीर दुखापत झाली.त्याला उपचारासाठी गोंडपिपरीच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हि जिनींग प्रेमलता गोनपल्लीवार,आनंदीदेवी सारडा यांच्या मालकीची आहे.

धानापूर येथे जंगलालगत जिनींग आहे.या जिनींगला आज दूपारच्या सुमारास अचानकपणे आग लागली. आगीची माहिती होताच सर्वत्र धावाधाव सूरू झाली. आग विझविण्याचे प्रयत्न करण्यात आले. पण आगीने रुद्ररूप धारण केले.यानंतर काही वेळात जवळपास दहा अग्नीशामक दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले.

आगीची माहिती कळताच प्रशासनाची चमू तातडीन घटनास्थळी दाखल झाली.आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.शेवटी अनेक तासाच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. पण तोपर्यत करोडो रूपयाचा कापूस जळून खाक झाला होता.
आगीच्या दरम्यान जिनींग परिसरात एका मजुराच्या पायाला  गंभीर दुखापत झाली.त्यामुळ त्याला उपचारासाठी गोंडपिपरीच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. जिनींगला हि आग नेमकी कशामुळ लागली.याचा तपास आता सूरू करण्यात आला आहे.

तहसिलदारांची तत्परता....

जिनीगला आग लागल्याची माहिती कळताच गोंडपिपरीचे तहसिलदार के.डी.मेश्राम आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी परिस्थीतीचा आढावा घेतला.आगीने मजुरांच्या जिवाचा धोका लक्षात घेता जीनींगचे एका बाजुची सरंक्षण भिंत तोडण्याचे आदेश त्यांनी  दिले.सोबत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी घटनास्थळी आग आटोक्यात येईपर्यत ते उपस्थीत होते.यावेळी पिएसआय धर्मराज पटले आपल्या सहकार्यासोबत उपस्थीत होते.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : परवानगी नाही... मुंबई खाली करा, नाहीतर आम्ही रस्त्यावर येऊन खात्री करु... मुंबई हायकोर्टाचं परखड मत

6,6,6,6,6,6,6... पोलार्डचं वादळ! ८ चेंडूत ठोकले तब्बल ७ षटकार, Video Viral

Solapur News:'निजामशाहीत असलेल्या ‘त्या’ ५८ गावांचा पुन्हा संघर्ष'; मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू झाल्यास उभा करावा लागणार स्वतंत्र लढा

Manoj Jarange: आमचा वाघ चार दिवसांपासून उपाशी, मग आम्ही सण का साजरा करायचा? महिलांचा महालक्ष्मीला भावनिक निरोप

Madhuri Elephant : ‘माधुरी हत्ती’ मठात परत येणे अशक्य? पुन्हा आंदोलन करण्याचा राजू शेट्टींचा इशारा

SCROLL FOR NEXT