First death due to corona in Yavatmal district 
विदर्भ

यवतमाळ ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोनामुळे पहिला मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 125 पर्यंत गेला आहे. यापैकी 99 जण बरे होऊन घरीही परतले. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नव्हता. मात्र, शनिवार याला उपवाद ठरला. आज एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 

मृत झालेल्या महिलेच्या प्रकृतीवर डॉक्‍टरांचे सुरुवातीपासून अतिशय काळजीपूर्वक लक्ष होते. तिला वाचविण्यासाठी डॉक्‍टरांनी मध्य रात्रीपासून शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, श्‍वासनाच्या त्रासामुळे तिचा मृत्यू झाला. जिल्ह्याच्या नागरिकांना विनंती आहे की, कोरोना संदर्भात काही लक्षणे दिसताच जवळच्या कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर आणि शासकीय आरोग्य संस्थेत जाऊन तपासणी करून घ्यावी. किंवा टोल फ्री नंबर वर संपर्क करावा. जेणेकरून बाधित रुग्णावर उपचार करणे सोयीचे होईल. 

हेही वाचा - तिसरे मंगलाष्टक सुरू झाल्यावर वधू म्हणाली, "तू मला पसंत नाहीस"
नागरिकांनी याबाबत कोणताही निष्काळजीपणा करू नये. तसेच जिल्ह्यात पहिल्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सर्व आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मुंबईवरून आलेला आणि सुरुवातीपासून संस्थात्मक विलागीकरण कक्षात भरती असलेल्या एका जणाचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ऍक्‍टिव पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या 25 झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT