accident 
विदर्भ

वेळ रात्री बाराची! पांढरी पुलावर सुसाट निघाली कार...आणि

सकाळ वृत्तसेवा

अंजनगावसुर्जी ( जि. अमरावती ) : कोरोनाच्या संकटाने नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन पाळत आहेत, मात्र काही महत्त्वाच्या कामासाठी काहींना बाहेर पडावेच लागते. विशेषत: आरोग्य क्षेत्रात काम करणारी मंडळी लॉकडाऊन मध्येही सतत कार्यरत आहे. खरेतर रस्त्यांवर सध्या गर्दीही नाही. तरीही एक भीषण अपघात होतो काय? आणि त्यात तीन व्यक्‍ती ठार होतात काय? सगळेच अघटित.
नागपूर येथून रुग्णालयाचे काम आटपून घरी परत येत असताना एका चारचाकी वाहनाला झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याची खळबळजनक घटना रात्री बारा वाजताच्या सुमारास घडली. अंजनगावसुर्जी येथून चार किलोमीटर अंतरावरील पांढरीच्या पुलावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला,अशी प्राथमिक माहिती आहे. वेळ रात्रीची होती. रस्ते मोकळा असल्याने वाहन भरधाव असावे, त्यातूनच हा अपघात झाला असल्याचे कळते. आश्‍चर्यकारकरित्या या वाहनातील प्रवाशांपैकी एक 20 वर्षीय मुलगा बचावला आहे, मात्र तो गंभीर जखमी असल्याने त्याला अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मृतात सुरेशराव भीमराव यावले (वय.60), शिलाताई सुरेश यावले (वय. 57. रा. गुलजारपुरा, अंजनगावसुर्जी), दीपक नामदेवराव नळकांडे (वय.42 रा. सातेगाव) यांचा समावेश आहे. शुभम सुरेश यावले (वय 20) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी अमरावतीला हलविण्यात आले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; जिल्हानिहाय संपूर्ण यादी समोर, तुमचा तालुका आहे का पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : लालबागच्या राजाचं 24 तासांनंतर विसर्जन, भाविकांचे पाणावले डोळे; समुद्रकिनारी मोठी गर्दी

तेव्हा मी अरिजीतपेक्षा जास्त लोकप्रिय होतो... अभिजीत सावंतचं मोठं विधान; म्हणतो- त्याला कुणी ओळखत नव्हतं

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

Jungle Safari: वाघ-हत्तींच्या सफारीपलीकडे उत्तराखंडची नवी झेप; आता पर्यटकांना दाखवणार ‘हिमालयीन घोस्ट

SCROLL FOR NEXT