Five policemen were injured in the bear attack gadchiroli news 
विदर्भ

अस्वलाच्या हल्ल्यात पाच पोलिस जवान जखमी

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : गडचिरोली पोलिस विभागाच्या सी-६० दलाचे जवान बुधवारी (ता. २४) सकाळी कुरखेडा तालुक्‍यातील टिपागड पहाडीवर नक्षलविरोधी शोध अभियान राबवीत असताना अचानक पहाडीवरील अस्वलांनी हल्ला केल्याने पाच जवान जखमी झालेत.

सी-६० दलाचे जवान बुधवारी टिपागड पहाडीवर नक्षलविरोधी शोध अभियान राबवीत होते. त्याच वेळी झुडुपात लपून बसलेल्या अस्वलांनी दोन जवानांवर हल्ला चढविला. या झटापटीत जवानांना वाचविण्यासाठी गेलेल्या तीन जवानांवरही हे अस्वल हल्ला करण्याचा प्रयत्न करीत होते. पण जवानांनी हा हल्ला परतवून लावला व अस्वलांना पिटाळून लावले. यात एकूण पाच जवान किरकोळ जखमी झाले आहेत.

सुधीर रंधये, ईश्‍वर मडावी, महेश कुडावले, कपिल जाधव व लोमेश करंगले असे जखमी जवानांची नावे आहेत. सुधीर, ईश्वर आणि महेश या तीन जखमी जवानांना हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी एका जवानाच्या पायाला अस्वलाची नखे टोचली असून इतर दोघे झटापटीत खाली पडल्यामुळे त्यांना केवळ खरचटले आहे. कपिल जाधव व लोमेश करंगले या जवानांना कोणतीही जखम झाली नसल्यामुळे मालेवाडा येथेच ठेवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT