flood affected people still waiting for help in singori kodamendhi of nagpur 
विदर्भ

'पुरानं सर्वच नेलंय; अद्याप विहिर उपसा नाही, आम्ही प्यायला पाणी आणायचं कुठून?'

संदीप गौरखेडे

कोदामेंढी ( जि. नागपूर ) :  'गावात पूर आला तर आम्ही पळत सुटलो. सोबत घेतलेल्या गाठोड्यात सामान होते त्यावरच १५ दिवस भागवले. पूर गेल्यावरही रोजीरोटी नाही, मजुरी नाही. शेतात पिकलेलं सर्वच वाहून गेलंय. घरात मातीचा थर. इतके दिवस झाले पण ग्रामपंचायतचे डोळे उघडले नाही. विहिर उपसा नाही. वीज नाही. आम्ही प्यायला पाणी आणायचं कुठून?' असा सवाल कोदामेंढी तालुक्यातील पूरग्रस्त नागरिक विचारत आहेत. ही व्यथा मांडताना त्यांना अश्रू अनावर झाले.

गावाचे पुनर्वसनासाठी मागणी केली. त्यासाठी तहसीलदाराला निवेदन दिले. पुरामध्ये घरांची पडझड झाली. त्याची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही. खावटी यायला दोन महिने लागले. काहींना खावटी मिळाली. मात्र, काही अद्यापही प्रतीक्षेतच आहेत. गावात चौथ्यांदा पूर आला. पण, हा पूर अंत्यत भयंकर होता. मातीचे पूर्ण घरे जमीनदोस्त झाली. गावात पूर्वपरिस्थितीच्या वेळी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री (जलसंपदा) बच्चू कडू, आमदार आशीष जयस्वाल, खासदार कृपाल तुमाने, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जि. प. अध्यक्ष रश्मी बर्वे, देवेंद्र गोडबोले आदी येऊन आश्वासने देऊन गेले. पण अद्याप काहीच झाले नाही. पूर आला तेव्हा पूर्ण गाव रिकामे करण्यात आले होते. येथील लोकांची राहण्याची व्यवस्था गावाजवळील आश्रमात करण्यात आली होती. बऱ्याच घरांची पडझड झाली असून शेतातील पिके वाहून गेली. रस्त्यावर दोन माणूस इतके पाणी होते. मिळेल त्या वाटेनी लोकांनी गावातून पळ काढला होता. पूर ओसरून दोन महिने अधिक होऊनही ग्रामपंचायतीने अद्याप पिण्याच्या पाण्याची सोय गावकऱ्यांसाठी केली नसल्याची ओरड येथील ग्रामस्थांची आहे. 

पूरपीडितांना अन्नधान्य किटचे वाटप केले. तेथील नागरिकांची आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य तपासणी करून घेतली. पाणीपुरवठा विहिरींचा उपसा करण्याबाबत सांगितले होते. याबाबत ग्रामसेवकास विचारणा करून त्यांना तत्काळ विहिरींचा उपसा करण्याच्या सूचना देण्यात येईल. अन्यथा काय कारवाई करता येईल, याबाबतही विचार करू. शासनस्तरावर काय मदत मिळविता येईल, यासाठई प्रयत्नरत आहे. सिंगोरी गावाचे पुनर्वसन करण्यात यावे याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले आहे. 
- शालीनी शेषराव देशमुख, जि.प.सदस्या 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: धुळे जिल्ह्यातील देशशिरवाडे येथे १.५ टन गोमांस जप्त

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT