विदर्भ

भंडाऱ्यात जेवणातून तब्बल १०४ लोकांना विषबाधा; वास्तुपूजनाचं जेवण पडलं महागात

सकाळ वृत्तसेवा

भंडारा - वास्तुपूजन म्हणजे घराच्या समृद्धीसाठी आणि नवीन घरातील स्वागतासाठी केलेली पूजा. मात्र लॉकडाउन (Corona Lockdown) काळात वास्तुपूजन करून अनधिकृतरित्या सार्वजनिक जेवण देणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. या सार्वजनिक जेवणात तब्बल 104 लोकांना जेवणातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याची धक्कादायक घटना भंडारा तालुक्याच्या कोथूरुणा येथे घडली आहे. (Food poisoning to 104 people in Bhandara district)

कौथुरना गावातील गजानन खोकले यांच्या घरी काल वास्तु पूजनाचा कार्यक्रम होता. आजूबाजूच्या तब्बल 12 गावातील तब्बल 200 लोक या कार्यक्रमात हजर होते. लोक घरी गेल्यांवर दुसऱ्या दिवशी लोकांना सकाळी अचानक अपचन, मळमळ, उलट्या असा त्रास होऊ लागला. अचानक लोकांची गर्दी कौथुरना प्राथमिक केंद्रात होऊ लागली. त्यानंतर तपासात वास्तूच्या जेवणातून हा प्रकार झाल्याचे उघड़ झाले. यात तब्बल 104 लोकांना विषबाधा झाली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता भंडाऱ्यातुन वैद्यकीय पथक गावात दाखल झाले. याप्रकरणी तब्बल 103 लोकांना प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आलं असून एका महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

या वास्तुपूजनाचे आयोजक घरमालक गजानन खोकले यांनासुद्धा विषबाधा झाली असून त्यांना प्राथमिक उपचार करून पाठवण्यात आलं आहे.

(Food poisoning to 104 people in Bhandara district)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या २५८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT