forest department action against encroachment in chandrapur  
विदर्भ

वनविभागाने कारवाई केली अन् अनेक कुटुंब रस्त्यावर आली, वनात केले होते अतिक्रमण

साईनाथ सोनटक्के

चंद्रपूर : बल्लारपूर बायपास मार्गावरील संरक्षित वनात अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या घरांवर वनविभागाने बुलडोझर चालविला. ही कारवाई शनिवारी (ता. 6) करण्यात आली. वनविभागाने अचानकपणे घरे पाडण्याची कारवाई केल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. या कारवाईने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वनविभागाने पूर्वसूचना दिली नसल्याचा तेथील नागरिकांचा आरोप आहे. तर, घरे बांधताना वनविभागाला पूर्वसूचना दिली नव्हती. त्यामुळे या अतिक्रमितांना घरे पाडण्याची पूर्वसूचना देण्याचा प्रश्‍नच उद्ध्वस्त नसल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी राहुल कारेकर यांचे म्हणणे आहे.

चंद्रपूर शहरालगतच्या बायपास मार्गाला लागून जंगल आहे. चंद्रपूर वनपरिक्षेत्रात संरक्षित वनक्षेत्र म्हणून हा भाग ओळखला जातो. या संरक्षित वनक्षेत्रात काही नागरिकांनी अतिक्रमण करून जंगलतोड केली. त्यानंतर तेथील जमिनीवर घरे बांधून वास्तव्य सुरू केले. काहींनी, तर पक्की घरे बांधली आहेत. शनिवारी दुपारच्या सुमारास अचानक वनविभागाचे पथक प्रकाशनगरात पोहोचले. वनाधिकाऱ्यांनी नागरिकांना अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जाणार असून, घरातील साहित्य बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या. मात्र, नागरिकांनी वनाधिकाऱ्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे वनाधिकाऱ्यांनी अनेक घरांवर बुलडोझर चालविणे सुरू केले. यामुळे अनेकांच्या घरातील साहित्याची नासधूस झाली. 

वनविभागाकडून अचानकपणे करण्यात आलेल्या कारवाईने अनेक कुटुंबे उघड्यावर आली. या प्रकाराची माहिती मिळताच नगरसेवक प्रदीप किरमे यांनी घटनास्थळ गाठून परिसरातील नागरिकांची समस्या ऐकून घेतली. वनविभागाच्या कारवाईने हातावर आणून पानावर खाणाऱ्या नागरिकांसमोर निवाऱ्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे.

वनविभागाने घरे पाडण्याची कारवाई करताना नागरिकांना पूर्वसूचना दिली असती, तर घरातील साहित्याची नासधूस झाली नसती. वनविभागाने ही कारवाई तत्काळ थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.
- प्रदीप किरमे, नगरसेवक, चंद्रपूर

फर्निचरचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. वनविभागाच्या या कारवाईने संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे. पूर्वसूचना दिली असती, तर अतिक्रमण हटविले असते. मात्र, या कारवाईत घरातील सर्व साहित्याची मोठी नासधूस झाली. 
- पीडित नागरिक, चंद्रपूर

मनपा, महावितरणला नोटीस देणार : कारेकर
वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून अनेकांनी घरे बांधली आहे. या अतिक्रमीत जागेवर घरे बांधणाऱ्यांकडून महानगरपालिका कर वसूल करीत आहे. तर, दुसरीकडे घरांना लागणारी वीज महावितरणकडून पुरविली जात आहे. हा प्रकार चुकीचा आहे. त्यामुळे यासंदर्भात महानगरपालिका प्रशासन आणि महावितरण कंपनीला नोटीस बजावणार असल्याचे चंद्रपूरचे वनपरिक्षेत्राधिकारी राहुल कारेकर यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT