zoo 
विदर्भ

राज्यातील प्राणीसंग्रहालयांबाबत वनमंत्र्यांनी दिले हे निर्देश... वाचा

सकाळवृत्तसेवा

यवतमाळ : अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील एका प्राणिसंग्रहालयातील वाघाला कोरोनाची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्राणी संग्रहालयांमध्ये व वन्यप्राणी बचाव केंद्रामध्ये अधिक दक्षता घेण्यात यावी तसेच केंद्रिय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले.
 
राज्यात विविध जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारित येत असलेल्या प्राणिसंग्रहालय किंवा वन्यप्राणी बचाव केंद्राशी तातडीने संपर्क साधून त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करावे, आवश्‍यकतेनुसार विलगीकरण करावे, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करावी, प्राणिसंग्रहालय किंवा वन्यप्राणी बचाव केंद्रातील प्राण्यांना संसर्ग आहे किंवा कसे, याबाबत खात्री करण्यासाठी संबंधित यंत्रणेशी त्वरित संपर्क साधून नमुना तपासणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत किमान आवश्‍यक मनुष्यबळ वगळता प्राणिसंग्रहालय किंवा वन्यप्राणी बचाव केंद्राच्या आत मानवी वावर वाढवू नये, असे स्पष्ट निर्देशही वनमंत्र्यांनी दिले आहेत. 

प्राणीसंग्रहालये व वन्यप्राणी बचाव केंद्रांनी अधिक दक्षता घ्यावी
राज्यात मुंबईतील बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व प्राणी संग्रहालय, भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय, पुण्यातील कात्रजमधील राजीव गांधी वन्यप्राणी संग्रहालय व संशोधन केंद्र, चिंचवडमधील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय, औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय, सोलापुरातील महात्मा गांधी राष्ट्रीय उद्यान व प्राणी संग्रहालय, नागपूरमधील महाराजबाग प्राणिसंग्रहालय, कोल्हापुरातील महाराजा शहाजी छत्रपती प्राणिसंग्रहालय, ढोलगरवाडीतील शेतकरी शिक्षण मंडळ सर्पोद्यान, नागपूरमधील गोरेवाडा येथील वन्यप्राणी बचाव केंद्र, माणिकडोह जुन्नरमधील बिबट बचाव केंद्र, वर्ध्यातील पीपल फॉर अॅनिमल शेल्टर हाऊस आणि हेमलकसा (जि. गडचिरोली) येथील आमटेज ऍनिमल पार्क, वन्यप्राणी बचाव केंद्र अशी एकूण 13 प्राणिसंग्रहालय व वन्यप्राणी बचाव केंद्रे आहेत. या सर्व ठिकाणी योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश वनमंत्र्यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT