Sanjay Rathod 
विदर्भ

वनमंत्री संजय राठोड यांनी सपत्निक धरला `किसी दिन बनुंगी राजा की राणी’ या गीतावर ठेका  

रामदास पद्मावार

दिग्रस (जि. यवतमाळ) : राज्याचे वनमंत्री आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने संजय राठोड यांच्याकडे कामाचा मोठा व्याप आहे. सतत नागरिकांच्या गराड्यात राहणारे पालकमंत्री संजय राठोड कुटुंबियांना कमी वेळ देतात. मात्र, पुतण्याच्या विवाह समारंभात अर्धांगिनीसोबत केलेले नृत्य वऱ्हाड्यांना चांगलेच भावले. ‘किसी दिन बनुंगी राजा की राणी’ या गीतावरील नृत्य सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.

यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे थोरले बंधू विजय राठोड यांच्या मुलाचा विवाह समारंभ नुकताच पार पडला. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शिवसेना पक्षाची विदर्भाची धुरा त्यांच्याच खांद्यावर आहे. नांदेड ते नागपूरपर्यंत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन असताना पालकमंत्री राठोड पुतण्याच्या विवाह समारंभात सहभागी झाले. अर्धांगिनी शीतल यांच्यासोबत नृत्याचा ठेका धरून कुटुंबप्रीय व्यक्ती म्हणून आपली ओळख करून दिली. 

कौटुंबिक कार्यक्रमात एकरूप झालेल्या पालकमंत्र्यांना बघून नातेवाइकांनाही सुखद धक्का बसला. आप्तस्वकीयदेखील या नृत्यात सहभागी झाले. राज्याचे वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यासह विदर्भाच्या शिवसेनेची धुरा असल्याने ते आठवड्यातील सातही दिवस व्यस्त असतात. त्यामुळे त्यांना पाहिजे तेवढा वेळ कुटुंबासह परिवारातील सदस्यांना देणे शक्‍य नाही. व्यस्त कार्यक्रमातूनही वेळ काढल्याने नातेवाइकांना आनंद झाला. आपण मंत्री आहोत, हे विसरून पत्नी शीतलसोबत केलेले नृत्य विवाह सोहळा अविस्मरणीय करणारा ठरला.

संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident एकमेकांचे जिवलग मित्र… मिळून थार घेतली; ताम्हिणी घाटात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची हृदयद्रावक करुणकथा

ऊसतोड मशीनमध्ये सापडून महिलेचा दुर्दैवी अंत; संक्रट्टी कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, हा भयंकर अपघात पाहून...

Pune News : काय सांगता? पुण्यात नगरसेवक पदासाठी चक्क १ कोटीची बोली...नेमका कुठं घडला प्रकार?

Tamhini Ghat Accident : प्रगतीची भरारी राहिली अर्धवट; अपघातानंतर कोंढवे धावडे, कोपरे परिसरात शोककळा

Latest Marathi News Live Update : तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी आज मालेगाव बंद

SCROLL FOR NEXT