Forest Minister Sanjay Rathore will leave for Pohoragad shortly 
विदर्भ

Video : वनमंत्री संजय राठोड पोहोरागडसाठी रवाना; गेल्या १५ दिवसांपासून होते भूमिगत

राजकुमार भीतकर

यवतमाळ : राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे गेल्या १५ दिवसांपासून भूमिगत होते. पूजा चव्हाण प्रकरणात त्यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर मंगळवारी प्रथम ते सार्वजनिकरित्या माध्यमांसमोर येणार आहे. पोहोरागड येथे जाण्यासाठी निघाले आहे. त्यासाठी सरकारी ताफा त्यांच्या बंगल्यावर पोहोचला होता. तिन्ही शिवसेना जिल्हा प्रमुख त्यांच्या सोबत आहेत.

संजय राठोड गेल्या दोन दिवसांपासून यवतमाळातच आपल्या निवासस्थानी मुक्कामी असल्याची माहिती मंगळवारी सूत्रांनी दिली. आज ते सकाळी ११ वाजता पोहोरागड येथे सहकुटुंब दर्शनासाठी जाणार आहेत. तसा त्यांचा अधिकृत दौराही जाहीर झाला आहे. वाटेत कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची तयारी करून ठेवली आहे.

परळी येथील टिकटॉक गर्ल पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर जनतेसमोर कधी येतात याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. त्यांच्याशी संवाद व्हावा, त्यांच्यावर झालेल्या आरोपासंदर्भाने माहिती मिळावी म्हणून माध्यमाचे प्रतिनिधी अजूनही त्यांच्या निवासस्थाबाहेर प्रतीक्षा करीत आहेत. ते कधी समोर येतात याची वाट बघत आहेत. ते बाहेर येताच थेट पोहोरागड येथे जाण्यासाठी निघणार असल्याची माहिती आहे.
अधिक वाचा - नवीन माहिती : संजय राठोड दोन दिवसांपासून यवतमाळातच मुक्कामी!
सर्वांचे लागले लक्ष
दुपारी २ वाजता धामणगाव देव येथे मुंगसाजी महाराज देवस्थानात देवदर्शनासाठी जाणार आहेत. तेथून थेट जिल्हाधिकारी कार्यालयात यवतमाळ येथे येऊन कोरोनाचा आढावा घेऊन उपाय योजना सुचविणार आहेत. हा त्यांचा शासकीय दौरा असून ते माध्यमासोबत काय बोलतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dattatray Bharane : 'भोंदूबाबा-महाराज हे सगळं झूट, पोरांनो त्यांच्या नादाला अजिबात लागू नका'; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सल्ला

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! सोनं-चांदी आणखी स्वस्त; पाहा आजचे ताजे भाव

April 2026 Calendar: हनुमान जयंती, अक्षय तृतीया ते सीता नवमी; आंब्याच्या मोसमातील खास सण आणि महत्त्वाचे दिवस जाणून घ्या

सोनम कपूरच्या घरी आला गोड पाहुणा, अभिनेत्री झाली आई, पोस्ट शेअर करत म्हणाली...

Satara ZP Controversy : मोठी बातमी! सातारा SP तुषार दोषींना 'सक्तीची रजा'; मंत्री शंभूराज देसाईंच्या आक्रमक पवित्र्यानंतर सरकारची कारवाई

SCROLL FOR NEXT