sutgirni 1. 
विदर्भ

आजी-माजी संचालक मंडळाची होणार चौकशी

सकाळ वृत्तसेवा

मलकापूर (जि. बुलडाणा) : हुतात्मा वीर जगदेवराव कापूस उत्पादक सह. सुतगिरणी मर्या. मलकापूरचे संचालक मंडळाने केलेल्या गैरव्यवहाराची तथा अपहाराची चौकशी होवून संचालम मंडळ बरखास्त करून संचालक मंडळाची एसआयटी मार्फत चौकशी करणेबाबत आ. राजेश एकडे यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने वस्त्रोद्योग विभागाकडून वस्त्रोद्योग आयुक्त यांना चौकशी करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सुतगिरणीच्या विद्यमान तथा माजी संचालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

एसआयटी मार्फत होणार चौकशी
मलकापूर, मोताळा, नांदुरा तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या हुतात्मा वीर जगदेवराव सहकारी सुतगिरणी मर्या. मलकापूरवर गेल्या 20 वर्षापासून विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष चैनसुख संचेती यांच्या अधिपत्याखालील संचालक मंडळ कार्यरत आहे. या दरम्यान सुतगिरणी संचालक मंडळाने मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहारा बरोबरच अपहार केल्याबाबत उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. तेव्हा संचेती यांच्या अधिपत्याखाली असलेल्या संचालक मंडळाच्या कार्यकाळातील सुतगिरणीमधील गैरकारभाराची तसेच अपहाराची एसआयटी मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी 24 फेब्रुवारी रोजी आ. राजेश एकडे यांनी वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांचेकडे केली होती. या निवेदनाची तत्काळ दखल घेत सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यावरून नुकतेच वस्त्रोद्योग विभागाचे कक्ष अधिकारी प्र. ग. पवार यांनी वस्त्रोद्योग विभागाचे आयुक्त यांना हुतात्मा वीर जगदेवराव कापूस उत्पादक सह. सुतगिरणी मर्या. मलकापूरचे संचालक मंडळाने केलेल्या गैरव्यवहाराची तथा अपहाराची चौकशी करण्याचे निर्देश दिल्याने संचालक मंडळात एकच खळबळ उडाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

गणपती बसवायचा आणि १५ सप्टेंबरला मुंबईला जायचं; मराठ्यांचं वादळ मुंबईत कधी धडकणार?

Marathi News Live Updates : पुढील २४ तास विदर्भात पावसाची शक्यता,३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT