Found four corona patients in Amravati 
विदर्भ

अमरावतीत आणखी चार नवीन रुग्ण; एकूण कोरोनाबधित 263

सकाळ वृत्तसेवा

अमरावरी : नागपूर व अकोल्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पहिल्या क्रमांकावर कोण राहणार जणू यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे. नागपूर व अकोला कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरले आहेत. आता यात अमरावती सहभागी होतो की काय, अशीच स्थिती निर्माण झाली आहे. येथे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अमरावतीत शुक्रवारी सकाळी चार नवे रुग्ण आढळून आलेत. यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 263 झाली आहे. 

प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी आलेल्या अहवालात फ्रेझरपुरा येथील 35 वर्षीय महिला, रुक्‍मिणीनगर येथील 23 वर्षीय महिला, गेट वे लाईफ हॉस्पिटलमधील 52 वर्षी पुरुष व औरंगपुरा येथील 22 वर्षीय महिलेचा कोरोनाबाधितांमध्ये समावेश आहे. ही बाब चिंता वाढवणारी ठरणारी आहे.

सोमवारी सकाळी जिल्ह्यातील आठ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आले होते. यात दसरा मैदान, बुधवारा, चेतनदास बगीचा, मसान गंज व काकडा (ता. अचलपूर) येथील सहा पुरुषांचा तर बुधबारा येथील दोन महिलांचा यात समावेश होता. काकडा येथील व्यक्ती मुंबई येथून 21 मे रोजी परतला होता. तो परतल्यापासून संस्थात्मक विलगीकरणात आहेत. त्याला ताप आल्याने अमरावती येथे रेफर करण्यात आले. त्याचा स्वॅब घेण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत संपर्क शोध व इतर तपास होत आहे. 

विदर्भातील रुग्णांची वाढती संख्या प्रशासनासाठी चिंता वाढवणारी ठरणारी आहे. आजवर यवतमाळ आणि अमरावतीत रुग्णांची संख्या कमी होती. मात्र, येथे अचानक रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने चिंता व्यक्‍त करण्यात येत आहे. तसेच नागपुरातही मे महिन्यात सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अचानक वाढलेल्या मृत्यूमुळेही नागपुरात चिंता वाढली आहे. दुसरीकडे अमरावतीत नागपूरच्या तुलनेत जास्त मृत्यू झाले आहे. आता येथील रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. यामुळे अमरावती नागपूरची बरोबरी करणार का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Government Land: पुणे जिल्ह्यात शासकीय जमिनींचा शर्तभंग; ३३० प्रकरणे उघड, ३५० कोटींच्या ३० ते ४० जागा शासनजमा

Latest Marathi News Live Update : गणेशोत्सव २०२६ साठी पुणे मेट्रोचे वेळापत्रक आणि प्रवाशांसाठी आवाहन

1980s चा ट्रेंड फॉलो केला... पण तेव्हाचा हा वादळी राजकीय किस्सा वाचा... सत्ता, पराभव, जेल अन् इंदिरा गांधींचं कमबॅक

Maharashtra Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींना मोठा फटका; वर्षभरात ६,३५० कोटींची घट, एनपीए ८.४४ टक्क्यांवर

US Open: झ्वेरेव सलग चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये; फायनलच्या तिकिटासाठी कोणाविरुद्ध होणार लढती?

SCROLL FOR NEXT