मोहाडी : वनविभागाने अटक केलेल्या आरोपींसह जप्त केलेले चितळाचे सिंग व साहित्य. 
विदर्भ

मांस शिजवतानाच ते अडकले जाळ्यात...मग वनविभागाने उचलले हे पाऊल

सकाळ वृत्तसेवा

मोहाडी (जि. भंडारा) : तालुक्‍यातील कांद्री वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या फुटाळा येथे चितळाची शिकार करण्यात आल्याचे प्रकरण मंगळवारी (ता. 7) उघडकीस आले. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे; तर बुधवारी (ता. 8) एका आरोपीस अटक करण्यात आल्याने आरोपींची संख्या आता चारवर पोहोचली आहे.

मागील सहा महिन्यांपूर्वी कांद्री वनविभागाच्या कार्यालयात बिबट्याचे कातडे सापडले होते. मात्र, हे प्रकरण वनविभागाकडून दाबण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे चितळ शिकार प्रकरणाने वनविभागाचे पितळ उघडे पडले आहे.

गोपनीय माहिती मिळाली

देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातला असल्याने प्रशासनाचे अधिकारी उपाययोजनेत व्यस्त आहेत. नेमक्‍या याच संधीचा फायदा शिकाऱ्यांनी घेतला. फुटाळा शिवारात चितळ शिकार झाल्याची गोपनीय माहिती कांद्री वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

चार आरोपींना अटक

या माहितीच्या आधारावर वनविभागाच्या पथकाने छापा टाकून काशिराम दोडकू नेवारे (वय 45), बेसाराम दोडकू नेवारे (वय 42 ) व रूपेश गंगाधर भलावी (वय 30) सर्व रा. फुटाळा यांना अटक केली. त्यांच्याकडून चितळ शिकारीसाठी वापरण्यात आलेले तारांचे फासे, पेचकस, आरी व शिकार केलेल्या चितळाचे शिजलेले मांस, यापूर्वी शिकार केलेल्या चितळाचे दहा सिंग, कातडी व इतर शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले होते. आरोपींची कसून चौकशी केली असता बुधवारी (ता. 8) सोविंदा महादेव शिवरकर (वय 60, रा. फुटाळा) याला अटक करण्यात आली.

आरोपींना पाच दिवसांची वनकोठडी

चारही आरोपींना मोहाडी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. सहा महिन्यांपूर्वी क्षेत्रसहायक चकोले यांच्या आलमारीत बिबट्याचे कातडे मिळाले होते.

या प्रकरणाचा तपास वनपरिक्षेत्राधिकारी के. जी. राठोड, क्षेत्रसहायक एम. ए. खान, एस. आर. उके, आर. डी. पांढरे, यू. एम. कोकडे, के. बी. नगरधने, एस. एस. शाह, एल. एम. जवलांगे, ए. एन. बोडके, आर. सी. शिंदे, आर. डी. भगत, एल. बी. बाजगीरे करीत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता दोन मिनिटांत दाखल होईल FIR, नागपूर पोलिसांनी AI च्या मदतीने विकसीत केली नवी प्रणाली..

Horoscope : उद्या 15 मार्चचा दिवस घेऊन येणार पैसाच पैसा; गजलक्ष्मी योगाने 4 राशींचे नशीब उघडणार, मोठे संकट दूर होणार

Mumbai News: पुन्हा मराठा आरक्षणाचा घाट कशासाठी? विरोधकांचा न्यायालयात युक्तिवाद

IPO नियमांमध्ये मोठा बदल! कंपन्यांना शेअर बाजारात लिस्टिंग सोपे होणार; केंद्र सरकारकडून नवी सुधारणा

Asiatic Election: एशियाटिक निवडणूक आणखी लांबणीवर! मतदार यादीतील गोंधळ कायम, निवडणूक पुन्हा स्थगित; नवीन तारीख काय?

SCROLL FOR NEXT