Four persons were swept away in the flood of Nala at Amla in Amravati 
विदर्भ

चौघांना घरी जाण्याची ओढ... एकमेकांचे हात घट्ट पकडले, पाण्याचा मधोमध हाताची साखळी तुटली अन् घडली दुर्दैवी घटना...

संतोष ताकपिरे

अमरावती : शहरालगतच्या वलगाव हद्दीतील आमला गावातील नाल्याला रविवारी रात्री पूर आला. या पुरात चौघे वाहून गेले. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. दुसऱ्याने झाडाचे मूळ पकडल्याने बचावला तर दोघे सोमवारी (ता. तीन) दुपारपर्यंत बेपत्ता होते. जिल्हा शोध व बचाव पथकाकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू होते. 

अंकुश सुरेश सगणे (वय २८, रा. आमला) असे मृत युवकाचे नाव असल्याचे वलगाव पोलिसांनी सांगितले. अंकुशसह विनायक कोरे, सतीश अण्णाजी भुजाडे, पद्माकर गोवर्धन वानखडे (सर्व रा. आमला) हे चौघेही वलगावात शेतमजुरीचे काम करायचे. रात्री उशिरापर्यंत काम केल्यानंतर चौघेही दुचाकीने वलगाव ते आमला मार्गावरील पुलाजवळ आले. परंतु, संततधार पाऊस सुरू असल्यामुळे पुलावरून पाणी वाहू लागले.

बऱ्याच वेळेपर्यंत त्यांनी पुराचे पाणी ओसरण्याची वाट बघितली. मध्यरात्री बारा वाजले तरी पुलावरील पाण्याचा ओघ कमी होत नव्हता. दुचाकी घेऊन जाणेही धोक्याचे वाटत होते. त्यामुळे त्यांनी दोन्ही दुचाकी पुलाजवळ सुरक्षित ठिकाणी लॉक करून उभ्या ठेवल्या. 

घरी जाण्याची ओढ असल्यामुळे चौघांनी एकमेकांचे हात घट्ट पकडले. कमरेपेक्षा जास्त पाणी असतानाही पुलावरून जाण्याचा धोका त्यांनी पत्करला. पाण्याचा जोर वाढल्यामुळे मधोमध असताना चौघांच्याही हाताची साखळी तुटल्याने ते वाहत गेले. त्यापैकी विनायक कोरे यांच्या हाती नाल्याच्या मधात असलेल्या झाडाचे मूळ सापडले. मूळ घट्ट पकडल्यामुळे कोरे बचावले. उर्वरित तिघे वाहत गेले.

सोमवारी (ता. तीन) पहाटे सहाच्या सुमारास ग्रामस्थांना नाल्याच्या काठावर अंकुश सगणे यांचा मृतदेह आढळला. वलगाव पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारात पाठविला. 

सकाळपासून मृतदेह शोधणे सुरू

मध्यरात्रीच वलगाव पोलिस घटनास्थळी पोहोचले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाला घटनेची माहिती देण्यात आली. रात्रीला शोधकार्य कठीण होते. त्यामुळे सोमवारी सकाळपासून शोधमोहीम सुरू झाली.

नातेवाइकांचा घटनास्थळी आक्रोश

आमला येथील तिघे पुरात वाहून गेल्याचे कळताच काहींनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली. पहाटेपासून अधिकच गर्दी वाढली. एकाचा मृतदेह सापडल्यानंतर बेपत्ता असलेल्यांच्या नातेवाइकांचा आक्रोश सुरू होता. मजुरीसाठी गेले अन् परत का आले नाही, असे वाक्य अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळाले. 

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT