नक्षलवाद्यांनी जाळपोळ केलेली वाहने.
नक्षलवाद्यांनी जाळपोळ केलेली वाहने. 
विदर्भ

नक्षल्यांनी जाळली कंत्राटदाराची चार वाहने

सकाळवृत्तसेवा

एटापल्ली (जि. गडचिरोली) : रस्ताच्या बांधकामाला विरोध दर्शवून नक्षलवाद्यांनी कामावरील चार ट्रॅक्‍टर जाळल्याची घटना गट्टा पोलिस ठाण्यापासून 10 किलोमीटर अंतरावरील पुस्के गावालगत मंगळवारी (ता. 12) रात्री घडली. यात कंत्राटदाराचे 40 ते 50 लाख रुपयांचे नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषद गडचिरोलीमार्फत 5054 योजनेअंतर्गत पुस्के गावापासून दीड किलोमीटर अंतर रस्तानिर्मितीचे काम केले जात आहे. हे काम अहेरीचे सतीश मुक्कावार नामक ठेकेदार करीत असून रस्त्यावर माती टाकली जात आहे. मंगळवारी सायंकाळी काम आटोपल्यानंतर चालकांनी चार ट्रॅक्‍टर पोलिस पाटील वीजा लेकामी यांच्या घराजवळ उभे करून चालक झोपले. रात्रीच्या सुमारास 40 ते 50 सशस्त्र नक्षलवाद्यांनी पोलिस पाटील वीजा लेकामी व वाहनचालकांना झोपेतून उठवून सर्व वाहने रस्त्यावर उभी करण्याचे फर्मान सोडले. चालकांना कोणतेही रस्ता निर्माण कार्य करण्यात येऊ नये, अशी धमकी देण्यात आली व ट्रॅक्‍टरच्या डिझेल ट्रॅंक कुऱ्हाडीने फोडून चारही ट्रॅक्‍टरवर डिझेल टाकून आग लावण्यात आली. यात वाहने जळून खाक झाली. यावेळी नागरिकांनी नक्षल्यांना वाहनांची जाळपोळ करण्यास विरोध केला. मात्र, कोणाचेही काही ऐकून न घेता नक्षल्यांनी सर्व वाहने जाळून टाकली.
पुस्के गावात जाण्यास कोणताही मजबूत रस्ता नसून या रस्ता निर्माण कामाने गावात जाण्यास रस्ता निर्माण झाला असता, अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केली. गावकऱ्यांच्या माहितीवरून गट्टा पोलिसांनी अज्ञात नक्षलवाद्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे.
नागरिक संतप्त
कोरची तालुक्‍यातील कोटगुल पोलिस ठाण्यांतर्गत तीन दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून गडचिरोली येथील योगेंद्र मेश्राम या शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली होती. पोलिस विभागाशी काहीच संबंध नसताना नक्षलवाद्यांनी केलेल्या कृत्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : १५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मिळणार १०% सूट

SCROLL FOR NEXT